
जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धांपैकी एक असणाऱ्या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत मॉडेल आणि अभिनेता असणाऱ्या मिलिंद सोमणने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे वयाच्या ५०व्या वर्षी मिलिंद सोमणने शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी ही स्पर्धा पूर्ण करून दाखविली. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) २००० स्पर्धकांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेस जिंकण्यासाठी मिलिंद यांनी तीन महिने प्रशिक्षण घेऊन स्पर्धेची तयारी केली होती. ३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर अंतरासाठी सायकल आणि ४२.२ किलोमीटर अंतर धावून पार करणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) मिशन आयर्नमॅन झुरीचच्या प्रशिक्षणासाठी मिलिंद यांनी १५ एप्रिलला सुरुवात केली. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी ते १५ किमी धावले. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) दुस-या दिवशी त्यांनी २ किमी स्विमिंग केले. तसेच, धावण्याचे अंतर १५ वरून २१ किमी इतके केले. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) या प्रशिक्षणात आराम आणि पोषक आहार यांचाही समावेश होता. १८व्या दिवशी मिलिंदने ५८ मिनिटांत १२ किमी अंतर पार पाडले. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या क्रीडाप्रकारांचा समावेश असतो. २६व्या दिवशी आयर्नमॅनसाठी आवश्यक असलेल्या पोषक आहाराची चाचणी दिली. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) ३० व्या दिवशी त्यांनी शरिराला मजबूतपणा आणण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. ५×२० स्कॉट्स, १०×१० स्कॉट जम्प्स, १०×१० बर्पीस, ६×१२ पूल अप्स आणि १२ किमी धावणे याचा यात समावेश होता. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) हवामान नेहमीच अनुकूल नसल्याने मिलिंद यांच्यासाठी या सर्व गोष्टी सोप्या नव्हत्या. ३३व्या दिवशी त्यांनी ३ तास सायकलिंग, ३० मिनिटे धावणे आणि २० पूल अप्स असा सराव केला. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) ३८व्या दिवशी अनुकूल हवामान असल्यामुळे त्यांनी ३० किमी पल्ला पार केला. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) ३९ व्या दिवसाच्या प्रशिक्षणात २ किमी पोहणे, ५ किमी धावणे, ३०मिनिटे प्लॅनक्स आणि डोंगर चढाईचा समावेश होता. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) ५४व्या दिवशीच्या प्रशिक्षणात मिलिंद यांनी थोनर तलावात १.८ किमी पोहणे, १०१ किमी सायकलिंग, १०० पूशअप्स, ८ किमी धावणे आणि १२० स्कॉट्सचा सराव केला. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) ५८व्या दिवशी ते २५ किमी धावले. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) ६५व्या दिवशी २ तास ट्रेनरवर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करण्यात आली. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक) ७६व्या दिवशी मिलिंद यांनी सायकलने १४० किमी अंतर गाठले. मिलिंद ४ नोव्हेंबर २०१५ रोजी वयाची पन्नाशी गाठणार आहे. या स्पर्धेचे विजेतेपद हेच माझ्यासाठी यंदाच्या वाढदिवसाची भेट आहे, असे मिलिंद सोमण यांनी म्हटले आहे. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक)
असा घडला ‘आयर्नमॅन’!
जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धांपैकी एक असणाऱ्या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत मॉडेल आणि अभिनेता असणाऱ्या मिलिंद सोमणने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे वयाच्या ५०व्या वर्षी मिलिंद सोमणने शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी ही स्पर्धा पूर्ण करून दाखविली. (छायाः मिलिंद सोमन फेसबुक)
Web Title: How milind soman trained to become an ironman