
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. (छाया – पीटीआय) शिलाँग येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया – पीटीआय) आगरतला येथे मदरशातील मुलांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया – पीटीआय) आगरतला येथील विद्यार्थ्यांनी ‘मिसाइल’चा मानवी आराखडा तयार करून भारताचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखल्या जाणा-या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया – पीटीआय) डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहताना गुरगाव येथील विद्यार्थी. (छाया – पीटीआय) डॉ. कलाम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी चिकमंगलुरमधील विद्यार्थी अशाप्रकारे एकत्र आले होते. (छाया – पीटीआय) वालुकाशिल्पकार सुदर्शन पटनाइक यांनी पुरी येथील समुद्रकिना-यावर आपल्या कलेच्या माध्यमातून डॉ. कलाम यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया – पीटीआय) मोराबाद येथील शालेय विद्यार्थी डॉ. कलाम यांना श्रध्दांजली वाहताना. (छाया – पीटीआय) प्रसिध्द चित्रकार रमझान हुसैन यांनी पेन्सिलने रेखाचित्र काढून डॉ. कलाम यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया – पीटीआय) चेन्नई येथील शाळेत डॉ. कलाम यांना श्रध्दांजली अर्पण करताना एका विद्यार्थीनीला आपले अश्रू अनावर झाले होते. (छाया – पीटीआय) आगरतला येथील मुलांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया – पीटीआय) भुवनेश्वर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया – पीटीआय) नवी दिल्लीतील काही सायकल स्वारांनी एकत्र येऊन माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया – पीटीआय) चेन्नईतील मरिना समुद्रकिना-यावरही डॉ. कलाम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. (छाया – पीटीआय) माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनावरील तिरंगाही अर्ध्यावर उतरविण्यात आला होता. (छाया – पीटीआय) रामनाथपुरम येथील ज्या शाळेत एपीजे अब्दुल कलाम यांनी शिक्षण घेतले त्या शाळेतही डॉ. कलाम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. (छाया – पीटीआय) मुंबईतील विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया – प्रदीप दास)
डॉ. कलाम यांना देशभरात श्रध्दांजली
दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्व राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. कलाम हे खरे सुपुत्र तसेच असाधारण व्यक्तिमत्त्व होते, असा गौरव सर्वानी केला.
Web Title: Tribute to former president apj abdul kalam