
षण्मुखानंद सभागृहात शनिवारी एसआयईएस शिक्षण संस्थेतर्फे दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. (छायाः प्रशांत नाडकर) पुणे जिल्ह्य़ातील माळीण गाव दरड कोसळल्याने पूर्ण गाडले गेले त्या घटनेची पुनरावृत्ती मणिपूरमधील जौपी परिसरात शनिवारी घडली आहे. म्यानमारच्या सीमेवर असलेल्या चंडेल जिल्ह्य़ातील अत्यंत दुर्गम चौपी परिसरातील एक गाव दरड कोसळल्याने पूर्ण गाडले गेले असून या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (छायाः पीटीआय) नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या अॅमेझॉन इंडिया कोचर विक २०१५मध्ये बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने रॅम्प वॉक केला. (छायाः पीटीआय) वाघ वाचवा मोहिमेत संपूर्ण शरिरावर वाघासारखा रंग मारून सहभागी झालेली शाळकरी मुले. (छायाः पीटीआय)
२ ऑगस्ट २०१५
Web Title: 02 august