
गायक-अभिनेता-दिग्दर्शक-संगीतकार किशोर कुमार यांची आज जयंती आहे. बॉलीवूडमध्ये १९४६-१९८७ सालापर्यंत आवाज आणि अभिनयाच्या जोरावर राज्य केलेल्या किशोर यांच्या जीवनावर एक झलक टाकूया. -
किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खंडवा या गावी झाला. त्यांचे मुळ नाव आभास कुमार, पण बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी नाव बदलून किशोर कुमार असे ठेवले.
-
किशोर कुमार यांनी आपल्या कारकीर्दित पार्श्वगायक, गीतकार, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार आणि पटकथाकार अशा अनेक भूमिका निभावल्या.
अभिनेता म्हणून त्यांनी १९४६ साली ‘शिकारी’ हा पहिला चित्रपट केला. ‘चलती का नाम गाडी’, ‘पडोसन’, ‘दिल्लीका ठग’, ‘नई दिल्ली’, ‘झुमरू’, ‘आशा’, ‘हाफ़ टिकट’, ‘श्रीमान’ ‘फ़न्टूश’ हे त्यांचे काही प्रमुख चित्रपट आहेत. आपल्या भावाच्या मदतीने अभिनेता म्हणून बरीच कामे त्यावेळी किशोर कुमार यांना मिळत गेली. पण, त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. १९४८ साली त्यांनी ‘जिद्दी’ चित्रपटात देव आनंद यांच्यासाठी गाणी गायले. मात्र, हे गाणे यशस्वी होऊनही त्यांना काही खास काम मिळू शकले नाही. त्यानंतर स्वतःची अशी गाण्याची वेगळी शैली त्यांनी निर्माण केली. -
आर. डी बर्मन यांनी किशोर कुमार यांच्याबरोबर ‘ओ माजी रे’, ‘ये शाम मस्तानी’, ‘ये जो मुहोब्बत है’, ‘रात कली एक ख्वाब में आयी’, ‘हमें तुमसे प्यार कितना’ आणि ‘मेरे नैना सावन भादों’सारखी अनेक गाणी साकारली.
‘बॉम्बे का चोर’ या चित्रपटात माला सिन्हा यांनी किशोरजींसोबत काम केले होते. -
किशोर कुमार यांनी हिंदी गाण्यासोबत तमिळ, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्ल्याळम, उडिसी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. त्यांना आठ वेळा फ़िल्मफेअर सर्वोत्तम पार्श्वगायकाचा पुरस्काराचा मान मिळाला आहे. या छायाचित्रात मुलगा अमित कुमारच्या गाण्यावर किशोरजींनी ठेका घेतलेला दिसतोय.
-
किशोरजींच्या पहिल्या पत्नी रुमा देवी आणि त्यांचा मुलगा अमित कुमार या छायाचित्रात दिसतो. पहिली पत्नी निवर्तल्यावर किशोर कुमार यांनी अभिनेत्री मधुबाला यांच्याशी विवाह केला. त्यांचा विवाह १९६१ साली झाला. मधुबाला या मुसलमान होत्या आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. असे सांगण्यात येते की या लग्नासाठी किशोर कुमार यांनी धर्मांतर करून आपले नाव “करीम अब्दुल” असे ठेवले होते. मधुबाला यांनी किशोर कुमारांबरोबर “चलती का नाम गाड़ी” (१९५८) सारख्या बऱ्याच चित्रपटात कामे केली. -
आजाराने ग्रस्त असलेल्या मधुबाला यांचे २३ फेब्रुवारी १९६९ साली निधन झाले. त्यामुळे किशोरजी आणि मधुबाला यांचा संसार केवळ नऊ वर्ष टिकू शकला.
किशोर कुमार यांच्यासह अभिनेता सुनील दत्त, गानसम्राज्ञीनी लता मंगेशकर, अभिनेता देव आनंद. किशोरजींनी गायलेली आने वाला पल जाने वाला है, ओ मेरे दिल के चैन, खाईके पान बनारस वाला, गीत गाता हूँ मैं, चलते चलते मेरे ये गीत, चिंगारी कोई भड़के, छूकर मेरे मन को, प्यार दीवाना होता है, फूलों का तारों का, दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, मुसाफ़िर हूँ यारो, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, रोते हुए आते हैं सब, सागर जैसी आँखों वाली, हम हैं राही प्यार के, हमें तुमसे प्यार कितना, ज़िंदगी इक सफ़र है सुहाना… ही गाणी खूप गाजली आहेत. गाण्याची चाल तयार करताना किशोर कुमार आणि संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर. ‘दुस्तु परजापती’ या चित्रपटातील किशोरजी आणि तनुजा यांच्यावर चित्रित करण्यात आलेले एक दृश्य. ‘बॉ़म्बे का चोर’ चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक एसडी नारंग यांच्या विनोदावर खळखळून हसताना किशोर कुमार. लहानपणापासून ते गायक-अभिनेता के. एल. सैगल यांचे प्रचंड चाहते होते. त्यांच्या गायनशैलीची नक्कल करण्याचा ते प्रयत्न करीत असत. परंतु, संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन यांनी त्यांना स्वत:ची गायनशैली निर्माण करण्याचा सल्ला दिला. पुढे जाऊन त्यांनी स्वत:ची अशी गायनशैली विकसित केली. एस डी बर्मन यांनी त्यांना अनेक गाणी गाण्याची संधी दिली. परदेशी तरुणींसह कॅमे-यास पोज देताना किशोर कुमार. किशोर कुमार यांच्यासह डान्सर मारा विझा यांचा दुर्मिळ फोटो. -
‘बेगुनाह’ चित्रपटाच्या सेटवर रिकाम्या वेळात आराम करताना कॉमेडियन राधाकिशन आणि किशोरजी. राधाकिशन यांनी केलेली सिगरेटची ऑफर किशोरजींनी हात जोडून नाकारलेली दिसतेय.
किशोर कुमार यांची चौथी पत्नी लिना चंदावरकर आणि मुलगा सुमीत. किशोरजींसह दिग्दर्शक बीआर चोप्रा या छायाचित्रात दिसत आहेत. टेबल टेनिसवर आपला हात आजमावताना किशोर कुमार. भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज राज कपूर आणि किशोर कुमार. किशोर कुमार आणि मुमताज. ‘श्रीमान’ चित्रपटात किशोरजी आणि जोहर यांच्यावर चित्रित केलेले एक दृश्य. किशोर कुमार यांचे एक दुर्मिळ छायाचित्र. ‘शरारत’ या चित्रपटात किशोर कुमार, मीना कुमारी आणि राजकुमार यांनी एकत्र काम केले होते. किशोरजी आणि त्यांचा मोठा मुलगा अमित कुमार. रस्त्यावरील एका गरिबास मदत करताना किशोर कुमार. १३ ऑक्टोबर १९८७ साली हृद्यविकाराच्या झटक्याने किशोर कुमार यांचा मृत्यू झाला. पण त्यांचा सुरेल आवाज आणि अभिनय सर्वांच्याच कायम लक्षात राहील.
अगर तुम न होते…
गायक-अभिनेता-दिग्दर्शक-संगीतकार किशोर कुमार यांची आज जयंती आहे. बॉलीवूडमध्ये १९४६-१९८७ सालापर्यंत आवाज आणि अभिनयाच्या जोरावर राज्य केलेल्या किशोर यांच्या जीवनावर एक झलक टाकूया.
Web Title: 86th birth anniversary of legend kishore kumar