-

वांद्र्यातील हिल रोड या परिसरातील अनेक भिंतींवर ग्राफिटी प्रकारात मोडणारी कलाकृती पहायला मिळतात. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
बऱ्याचदा हॉलीवूड किंवा बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये एखादे टोळके भिंत रंगविताना अथवा एखाद्या वाहनावर स्प्रे पेटिंग करताना दिसतात. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
एखादी भिंत रंगविण्याला अथवा एखादा पृष्ठभाग रंगविण्याच्या या पद्धतीला ग्राफिटी असे म्हणतात. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
मुंबईत सर्वात पहिल्यांदा वांद्र्यातील हिल रोड परिसरात ग्राफिटी पेटिंग काढण्यास सुरूवात झाल्याचे सांगण्यात येते. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींपासून अनेक कार्टून कॅरेक्टर्सची चित्रे पाहायला मिळतात. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
गेल्या काही वर्षांत या चित्रांमधील रंग पुसट झालेले दिसतात. तसेच यापैकी अनेक भितींना तडे गेले असले तरी अजूनही ही चित्रे लक्ष वेधून घेतात. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
या कलेचा जन्म सुमारे ८० च्या दशकात इंग्लंडमध्ये झाला व हळूहळू ती संपूर्ण जगात पसरली. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
या प्रकारात चित्र काढण्याकरिता विविध रंगांनी भरलेले स्प्रे वापरले जातात. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
स्प्रेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची नोझल कॅप. विविध प्रकारांत उपलब्ध असणारी कॅप विविध प्रकारच्या पेटिंगसाठी वापरली जाते. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
-
'जर्मन कॅप' , 'फॅट न्यूयॉर्क कॅप' यांचा वापर आऊटलाईनसाठी केला जातो. तर 'आँरेंज कॅप', 'थिन न्यूयॉर्क कॅप' यांचा वापर आतील रंग भरण्यासाठी केला जातो. 'रुस्टो कॅप' ही विविध छटा देण्यासाठी उपयोगात येते. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
-
-
-
-
-
-
हर दिवार कुछ कहती है
बऱ्याचदा हॉलीवूड किंवा बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये एखादे टोळके भिंत रंगविताना अथवा एखाद्या वाहनावर स्प्रे पेटिंग करताना दिसतात.
Web Title: Hill road in bandra streets are decorated with graffiti and paintings