-
मध्यप्रदेशच्या हरदामध्ये मंगळवारी रात्री दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना भीषण अपघात झाला.
-
कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.
-
हे रूळ ओलांडतानाच कामायनी एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले.
-
त्यानंतर काही वेळाने जबलपूरहून मुंबईकडे येणाऱ्या जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबेही त्याच ठिकाणी रुळावरून घसरले.
-
अपघातानंतर दोन्ही गाड्यांचे काही डबे पाण्याखाली गेले असून त्यात अनेक प्रवासी अडकले आहेत.
-
अत्यंत भीषण अशा या अपघातात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली असून ३०० हून अधिक जणांना वाचविण्यात यश आल्याचे समजते. घटनास्थळी रेल्वेच्या बचाव पथकाकडून मदत व बचावकार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
-
कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. हे रूळ ओलांडतानाच कामायनी एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले.
-
जबलपूरहून मुंबईकडे येणाऱ्या जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबेही त्याच ठिकाणी रुळावरून घसरले.
-
मृत्युमुखींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली आहे, तर गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये दिले जाणार आहेत.
-
या अपघातामुळे मुंबई-इटारसी रेल्वे मार्गावरील गाड्यांवर परिणाम झाला असून चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर इतर गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
असा घडला मध्य प्रदेशातील भीषण रेल्वे अपघात
कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.
Web Title: Twin train derailments in madhya pradesh