• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. maharashtra bhushan award ceremony

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना बुधवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Updated: October 6, 2021 13:44 IST
Follow Us
    • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना बुधवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात 'महाराष्ट्र भूषण' हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (छाया- प्रशांत नाडकर)
    • 1/14

      आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीड, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित केले जाते. (छाया- प्रशांत नाडकर)

    • 2/14

      रोख रक्कम दहा लाख रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असते. (छाया- प्रशांत नाडकर)

    • 3/14

      चर्चा, चिकित्सा, मूल्यांकनातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहून शिवचरित्र लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला, असं प्रांजळ उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार स्वीकारल्यानंतर काढले. (छाया- प्रशांत नाडकर)

    • 4/14

      ज्ञानेश्वरीपासून प्रेरणा घेऊनच शिवचरित्र लिहिलं असल्याचं ते यावेळी म्हणाले. इतिहास हे मौलिक धन आहे. ते माझं एकट्याचं नसून ते सर्वांचं आहे, त्यामुळे त्याचा अवमान करता कामा नये. मला कधीही अहंकाराचा वारा लागला नाही आणि लागूही देणार नाही, असंही बाबासाहेब पुढे म्हणाले. (छाया- प्रशांत नाडकर)

    • 5/14

      आज मी दहा लाखांनी श्रीमंत झालेलो आहे. परंतु, पुरस्काराच्या रकमेतले फक्त १० पैसे स्वत:साठी घेणार असून पुरस्काराचे १० लाख व माझ्याकडील १५ लाख, असे २५ लाख रुपये कर्करोग झालेल्या रूग्णांच्या उपचारांसाठी देणार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. (छाया- प्रशांत नाडकर)

    • 6/14

      या सोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    • 7/14

      महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांचे राजभवनात आगमन झाले तेव्हा टिपलेले छायाचित्र.

    • 8/14

      तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाला मदत करणार असल्याचं ते म्हणाले. (छाया- प्रशांत नाडकर)

    • 9/14

      'महाराष्ट्र भूषण' हा मोठा सन्मान आहे. या पुरस्काराचा मी अतिशय जबाबदारीने स्वीकार करत असून त्यामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे, असं बाबासाहेब यावेळी म्हणाले. (छाया- प्रशांत नाडकर)

    • 10/14

      बुधवारी बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९४ व्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा राजभवनातील छोटेखानी पण दिमाखदार सोहळ्यात राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. (छाया- प्रशांत नाडकर)

    • 11/14

      दरबार हॉलच्या प्रवेशद्वारावर उभे असलेले मावळे.

    • 12/14

      या सोहळ्यासाठी राजभवनातील दरबार हॉलचे व्यासपीठ अशाप्रकारे सजविण्यात आले होते.

    • 13/14

Web Title: Maharashtra bhushan award ceremony

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.