-

पावसाच्या गैरहजेरीत रविवारी पार पडलेल्या ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन स्पध्रेत पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमधील जयवीर सिंग आणि पुणे अॅथलेटिक्स क्लबच्या मनीषा साळुंके यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकावले.
-
शर्यतीत जवळपास २४ हजार ३२३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, परंतु त्यातील बहुतेक स्पर्धक हौशी असल्यामुळे जेतेपदासाठी चुरस रंगलीच नाही. (छायाः दीपक जोशी)
१८ वर्षांखालील मुलांच्या शर्यतीत नाशिकच्या किसन तडवीने अव्वल स्थान पटकावले. (छायाः दीपक जोशी) -
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मध्ये ठाणे स्वच्छ व हिरवेगार करुया,मुली वाचवा ,झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश देण्यात आला. (छायाः दीपक जोशी)
पुरुषांच्या २१ किलोमीटरच्या शर्यतीत मूळच्या हरयाणाच्या जयवीरने १ तास ०८ मिनिटे १२.९ सेकंदाची वेळ नोंदवत बाजी मारली. ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीतील माजी राष्ट्रीय विजेत्या जयवीरने पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावले. (छायाः दीपक जोशी) पुण्याच्या बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप अॅण्ड सेंटरच्या अनिश थापाने १ तास ०८ मिनिटे ४३.५ सेकंदाची, तर नाशिकच्या भोसला साई सेंटरच्या कांतीलाल कुंभारने १ तास ०९ मिनिटे २२.७ सेकंदाची वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. (छायाः दीपक जोशी) महिलांच्या १५ किलोमीटर शर्यतीत मनीषाने ५८ मिनिटे १९.२ सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. (छायाः दीपक जोशी) मनिषाच्या पाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या नीलम राजपूत (१:००: ७ सेकंद) आणि विजयमाला पाटील (१:००: ४३ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. (छायाः दीपक जोशी) १५ वर्षांखालील (५ किमी) मुले : शिरीषकुमार पवार (१५: ५५.०७ सेकंद), दिनेश पठारे (१५:५९.०८ सेकंद), चिराग सावंत (१६:२५.०२ सेकंद); मुली : नेहा फुफाणे (१८:३५सेकंद), अदिती पाटील (१८:४० सेकंद), अश्विनी मोरे (१८:५७ किमी) १२ वर्षांखालील (३ किमी) मुले : कल्पेश गायकर (९:३९.६० सेकंद), ब्रिजेश चोहान (९:४८.५० सेकंद), अवधूत हिंगे (१०:०८.७० सेकंद); मुली : साक्षी जाधव (११:११ सेकंद), निशा राय (१२:०३ सेकंद), संजना फुफाणे (१२:२२ सेकंद) -
वर्षां मॅरेथॉनला ज्येष्ठ नागरिकांचाही उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. (छायाः दीपक जोशी)
वरिष्ठ नागरिक (५०० मीटर) पुरुष : संभाजी डेरे (०२:१८ सेकंद), एकनाथ पाटील (०२:२२ सेकंद), श्रीधर धोडीयाल (०२:३५ सेकंद); महिला : सुनंदा देशपांडे (०३:१२ सेकंद), पद्मजा चव्हाण (०३:१३ सेकंद), नॉनकी नेहलानी (०३:२४ सेकंद). (छायाः दीपक जोशी)
ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन
पावसाच्या गैरहजेरीत रविवारी पार पडलेल्या ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन स्पध्रेत पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमधील जयवीर सिंग आणि पुणे अॅथलेटिक्स क्लबच्या मनीषा साळुंके यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकावले.
Web Title: Thane mayor varsha marathon