• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. u mumba crowned champions after thrilling win over bengaluru bulls in final

कुणीही घ्या पंगा जिंकेल फक्त यू मुंबा

वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममधील प्रेक्षकांच्या ‘कुणीही घ्या पंगा जिंकेल फक्त यू मुंबा..’ या आरोळ्या सार्थ ठरवत यू मुंबाने प्रो कबड्डी लीगच्या जेतेपदाला रविवारी गवसणी घातली. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणा-या अंतिम फेरीच्या लढतीत यू मुंबाने बंगळुरु बुल्सवर ३६-३० असा विजय मिळवला. गेल्यावर्षी मुंबईला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. (छायाः पीटीआय)

Updated: October 6, 2021 12:32 IST
Follow Us
    • वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममधील प्रेक्षकांच्या ‘कुणीही घ्या पंगा जिंकेल फक्त यू मुंबा..’ या आरोळ्या सार्थ ठरवत यू मुंबाने प्रो कबड्डी लीगच्या जेतेपदाला रविवारी गवसणी घातली. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणा-या अंतिम फेरीच्या लढतीत यू मुंबाने बंगळुरु बुल्सवर ३६-३० असा विजय मिळवला. गेल्यावर्षी मुंबईला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. (छायाः पीटीआय)
    • 1/11

      मुंबईकरांच्या साक्षीने अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील यू मुंबा संघाने प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेतेपदाला गवसणी घातली. अखेरच्या काही मिनिटांपर्यंत उत्कंठा टिकवणाऱ्या अंतिम सामन्यात यू मुंबाने बंगळुरू बुल्सचा ३६-३० असा पराभव केला.

    • 2/11

      अनुपने अखेरच्या चढाईत मनजित चिल्लरला बाद करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर मैदानावर एक अनोखा जल्लोष यू मुंबा संघातील खेळाडूंनी साजरा केला.

    • 3/11

      वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आपल्या पोलादी बचावाचा प्रत्यय दिला, तर दुसऱ्या सत्रात आक्रमणाची कसोटी लागली. (छायाः दिलीप कागडा)

    • 4/11

      भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रो कबड्डीच्या मंचावर अवतरला आणि चाहत्यांनी ‘माही माही’चा घोष केला.

    • 5/11

      धोनीने काही दिवसांपूर्वीच पूर्ण केलेला पॅराट्रपर होण्याचा प्रवास उलगडला. लेफ्टनंट कर्नल पदावर असलेला धोनी १०६ पॅराशूट रेजिमेंटचा भाग आहे. धोनीच्या हस्तेच प्रो कबड्डी दुसऱ्या हंगामाच्या विजेत्या संघाला देण्यात येणार असलेल्या चषकाचे अनावरण झाले. (छायाः दिलीप कागडा)

    • 6/11

      अत्यंत कमी कालावधीत बॉलीवूडमध्ये आपल्या अभियानाने छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्टने राष्ट्रगीत सादर केले.

    • 7/11

      या वेळी धोनीसह अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यासह भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दन गेहलोत आणि प्रो कबड्डीचे सहसंस्थापक आनंद महिंद्र उपस्थित होते.

    • हिल्या सत्रात आमचा बचाव चांगला झाला होता. २३-२३ अशा बरोबरीनंतरही आम्ही जिंकू हा विश्वास होता. शब्बीर बाबूने एका चढाईत टिपलेल्या तिन गुणांमुळे सामन्याचे चित्र पालटले, विजयाचे श्रेय त्यालाच द्यावे लागेल. या जेतेपदाची एक वर्ष प्रतीक्षा करत होतो. – अनुप कुमार, यू मुंबा कर्णधार
    • 8/11

      अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ.

    • 9/11

      सामन्याला जयपूर पिंक पँथर्स संघाचा मालक आणि बॉलीवूडमधील हिरो अभिषेक बच्चन आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनीही हजेरी लावली होती.

Web Title: U mumba crowned champions after thrilling win over bengaluru bulls in final

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.