-

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे गोदावरीच्या तिरावर सुरुवात झाली. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी जुना, अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीस्नान केले.
-
सिंहस्थासाठी देशभरातील साधू, संत आणि महंत यांचा मुक्काम असलेल्या साधुग्राम व तपोवनाचे सगळ्यांच्याच मनामध्ये कुतूहल असल्याने हा परिसर पाहण्यासाठी व विविध मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
-
त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर साधू-महंतांचे पहिले शाहीस्नान शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडले असून नाशिकमधील रामकुंडावर आठच्या सुमारास असाच कार्यक्रम पार पडेल.
-
कुंभमेला निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.
-
महामंडलेश्वर कॉम्प्युटर बाबा यांची हेलिकॉप्टरने शाही स्नानाला जाण्याची परवानगी प्रशासनाने नाकारल्याने ते रथातून मिरवणूकीत सहभागी झालेले दिसले.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
कुंभमेळाः शाहीपर्वास मंगलमय प्रारंभ…
ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी जुना, अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीस्नान केले.
Web Title: Nashik kumbhmela 015