-

ढोल-ताशे.. बॅण्ड पथकाचा दणदणाट..नाशिकमध्ये ‘सियावर रामचंद्र की जय’ तर त्र्यंबकमध्ये ‘बम बम भोले’च्या जयघोषात सिंहस्थातील पहिली पर्वणी साधू-महंतांच्या अपूर्व उत्साहात पार पडली. (छायाः वसंत प्रभू)
-
र्यंबक येथे पहाटे तीन वाजता तर नाशिक येथे सकाळी सहा वाजता अभूतपूर्व उत्साहात आणि कडेकोट बंदोबस्तात शाही मिरवणुकीला सुरुवात झाली. (छायाः वसंत प्रभू)
-
पंचनाम जुना, पंचायती आवाहन, पंचायती अग्नी, निरंजनी, आनंद, महानिर्वाणी, अटल या आखाडय़ांनी क्रमाने कुशावर्त कुंडात स्नान केले. (छायाः वसंत प्रभू)
-
सकाळी सहा ते आठ ही वेळ वैष्णव पंथीयांसाठी राखीव असल्याने शाही स्नान काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते. (छायाः वसंत प्रभू)
-
ग्रस्थानी धर्मध्वजा घेऊन मार्गक्रमण करताना भाले, तलवारी, कृपाण, दांडपट्टा आदी पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. (छायाः वसंत प्रभू)
-
मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा प्रसाद अथवा नाणी, वस्तू, फुले उधळण्यास प्रतिबंध होता. खुद्द महंत ग्यानदास महाराज यांनी हाती दहा रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन श्रीमंतीचे दर्शन घडविले.
-
रामकुंड व कुशावर्त येथे शनिवारी सिंहस्थातील पहिल्या पर्वणीस येण्यापासून भाविकांना प्रतिबंध करणे व गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ठिकठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदीचा विपरीत परिणाम भाविकांची फरफट होण्यात झाला. (छायाः वसंत प्रभू)
-
पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे, मनसेचे महापौर अशोक मुर्तडक आदींनीही आखाडय़ांचे शाही स्नान पूर्ण होण्याआधीच यथेच्छ डुंबण्याचा आनंद घेतला. (छायाः वसंत प्रभू)
-
पर्वणीला अंदाजापेक्षा कमी भाविक दाखल होण्यामागे सुरक्षा यंत्रणांनी केलेला बागुलबुवा हेदेखील महत्त्वाचे कारण ठरले. (छायाः वसंत प्रभू)
-
कुंभमेळ्यातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरात दाखल झालेल्या साधूसंत व महंतांनी शनिवारी सिंहस्थाताली पहिल्या पर्वणीतील शाही स्नानाच मुहूर्त साधला. गोदाघाटावरील रामकुंड परिसरात शाही स्नानासाठी झालेली गर्दी. (छायाः वसंत प्रभू)
-
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांचे शागीर्द आ. जयंत जाधव, शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मनसेचे महापौर मुर्तडक, भाजपचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री महाजन, आ. फरांदे या सर्वानी स्नानाचा मनसोक्त आनंद घेतला. (छायाः वसंत प्रभू)
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तावर शाही स्नानाचा आनंद लुटताना संत महंत. (छायाः वसंत प्रभू) -
ही स्नानानंतर त्र्यंबक राजाचे दर्शन घेत साधू-महंतांनी प्रस्थान केले. (छायाः वसंत प्रभू)
-
त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी भाविकांना १० किलोमीटरची पायपीट करावी लागली. (छायाः वसंत प्रभू)
-
अनेक आखाडय़ांनी रत्नजडित आभूषणांनी मढलेल्या सोन्या-चांदीच्या देवता, सुवर्ण-चांदीचे आवरण असणाऱ्या सिंहासनांद्वारे आपली श्रीमंती अधोरेखित केली. (छायाः वसंत प्रभू)
-
(छायाः वसंत प्रभू)
-
(छायाः वसंत प्रभू)
-
(छायाः वसंत प्रभू)
-
(छायाः वसंत प्रभू)
-
(छायाः वसंत प्रभू)
फोटोः नोटांची उधळण, ऐश्वर्याचे प्रदर्शन आणि घातक शस्त्रांचे खेळ..
ढोल-ताशे.. बॅण्ड पथकाचा दणदणाट..नाशिकमध्ये ‘सियावर रामचंद्र की जय’ तर त्र्यंबकमध्ये ‘बम बम भोले’च्या जयघोषात सिंहस्थातील पहिली पर्वणी साधू-महंतांच्या अपूर्व उत्साहात पार पडली.
Web Title: Kumbhmela shahisnan