-

चीनच्या हार्बिन शहरात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय 'स्नो फेस्टिव्हल' साजरा केला जात आहे. हार्बिनमध्ये दरवर्षी या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. या फेस्टिव्हलमध्ये बर्फाने साकारलेले उंच राजवाडे आणि विवध शिल्पाकृती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. (एपी)
-
या फेस्टिव्हलमध्ये भव्य राजवाडे, इमारती आणि टॉवर हे पूर्णपणे बर्फाने साकारण्यात आले आहेत. जणू एक बर्फाचं संपूर्ण शहर येथे वसलं आहे.
-
स्नो फेस्टिव्हलच्या उदघटानावेळी जोरदार आतषबाजी करण्यात आली.
-
बर्फाने साकारण्यात आलेल्या या महलांच्या आता जाऊन 'थंडा थंडा कूल कूल' अनुभव देखील नागरिकांना घेता येतो.
-
बर्फाने साकारलेल्या कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
-
बर्फाने साकारण्यात आलेले शिल्प.
-
बर्फाच्या शिल्पांना आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. त्यामुळे या राजवाड्यांना एक आकर्षक रुप प्राप्त झालं आहे.
-
दरवर्षी वेगवेळ्या थिमवर हार्बिन शहरात स्नो फेस्टिव्हलमध्ये बर्फाच्या विविध कलाकृती साकारण्यात येतात.
-
बर्फाच्या कलाकृतीला आकार देताना शिल्पकलाकार.
-
दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक स्नो फेस्टिव्हलची मजा लुटण्यासाठी चीनमध्ये दाखल होतात.
-
बर्फांच्या शिल्पांना रोषणाईचा मुलामा मिळाल्याने फेस्टिव्हलला आणखीच रंगत आली आहे.
-
शिल्प तयार झाल्यानंतर त्यावर शेवटचा हात अर्थात पॉलीशींगचे काम करताना शिल्प कलाकार.
-
स्नो फेस्टिव्हलच्या उदघटनादिवशी चीनच्या १५ जोडप्यांचा याच बर्फाने साकारण्यात आलेल्या शहरात विवाहसोहळा देखील पार पडला.
थंडा थंडा कूल कूल…चीनमध्ये ‘स्नो फेस्टीव्हल’ची धूम..
Web Title: Breathtaking pictures from chinas harbin ice and snow festival