• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. valentines week roses and their meanings

आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचे गुलाब द्याल…

February 9, 2016 01:43 IST
Follow Us
    • सध्या 'व्हॅलेंटाईन्स डे' जवळ येऊन ठेपल्याने नव्याने प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांकडून आवडत्या व्यक्तीसमोर मनातील भावना कशा बोलून दाखवायच्या यासाठी निरनिराळे प्लॅन्स आखले जात असतील. आजही आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन त्याच्यासमोर मनातील भावना व्यक्त करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे मानायला हरकत नाही. मात्र, गुलाबाच्या रंगाप्रमाणे मनातील भावनांचा अर्थही बदलतो. वेगवेगळ्या रंगातील गुलाब देण्यामागचा संदेश काय, यावर टाकलेली एक नजर. (छाया- थिंकस्टॉक इमेजेस)
    • लाल गुलाब- लाल रंगाचे गुलाब हे निर्विवादपणे प्रेमाचे प्रतिक आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे हा संदेश हा गुलाब देतो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात. (छाया- थिंकस्टॉक इमेजेस)
    • 1/

      पांढरा गुलाब- पांढऱ्या रंगाचे गुलाब पवित्रता, शुद्धता आणि निरागसतेचे प्रतिक मानले जाते. या रंगाचे गुलाब देण्यामागे दोन अर्थ असू शकतात. एक म्हणजे नवीन नात्याची सुरूवात, त्यामुळेच या रंगाची फुले लग्नांमध्ये वापरली जातात. दुसरा अर्थ म्हणजे शेवट. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला पांढऱ्या रंगाचे गुलाब देताना सावधानता बाळगा. (छाया- थिंकस्टॉक इमेजेस)

    • 2/

      गुलाबी गुलाब- तुम्हाला एखादी व्यक्ती विशेष आवडत असेल तर त्याला तुम्ही गुलाबी रंगाचा गुलाब भेट देऊ शकता. या रंगाचे गुलाब एखादी व्यक्ती आवडत असल्याचा सूचक संदेश आहे. (छाया- थिंकस्टॉक इमेजेस)

    • 3/

      पिवळा गुलाब- पिवळ्या रंगाचे गुलाब मैत्रीचे प्रतिक मानले जाते. पिवळ्या रंगाच्या गुलाबाचा गुच्छ देणे सांगते की तू माझा जीवलग मित्रमैत्रीण होतास आणि कायमस्वरूपी राहशील. (छाया- थिंकस्टॉक इमेजेस)

    • 4/

      केशरी गुलाब- केशरी रंगाचे गुलाब आवड आणि उर्जेचे प्रतिक मानले जाते. या रंगाचे गुलाब देऊन तुम्ही मनातील उत्कट भावना व्यक्त करू शकता. (छाया- थिंकस्टॉक इमेजेस)

    • 5/

      पीच गुलाब- एखादी व्यक्ती तुम्हाला नुकतीच आवडायला लागली असेल किंवा एखाद्यावर तुमचा क्रश असेल त्या व्यक्तीला पीच रंगाचे गुलाब देऊ शकता. (छाया- थिंकस्टॉक इमेजेस)

TOPICS
प्रेमLoveरिलेशनशिपRelationship

Web Title: Valentines week roses and their meanings

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.