• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. vaishali shadangule the celebrated designer

मराठमोळी फॅशन डिझायनर वैशाली एस. ला भेटण्याची संधी

February 10, 2016 14:25 IST
Follow Us
  • Vaishali S, designer, Vaishali Shadangule, Fashion,Vaishali shadangule collection Photos,डिझायनर वैशाली एस फोटो
    1/

    अस्सल देशी वस्त्रांना फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या आणि या क्षेत्रावर स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या डिझायनर वैशाली एस. यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 2/

    फॅशन विश्वाच्या झगमगाटी रूपाने आपले डोळे दिपून जातात. त्या क्षेत्रातला पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही आकर्षित करते. तरी या झगमगाटामागील परिश्रम, चिकाटी, जिद्द आणि धडाडीची बाजू अप्रकाशितच असते. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 3/

    ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाउंज’मध्ये फॅशन विश्वाच्या अप्रकाशित बाजूवर प्रकाशझोत पडणार आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील करिअर संधींचा मंत्रही घुमणार आहे! (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 4/

    फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नेमक्या कुठल्या कौशल्यांची आवश्यकता असते, या क्षेत्रात करिअरच्या किती आणि कशा प्रकारच्या संधी आहेत, आव्हाने कोणती हे वैशाली यांच्यासोबतच्या गप्पांमधून उलगडेल. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 5/

    वैशाली एस. हा ब्रॅण्ड देशातील प्रमुख ‘फॅशन वीक’मधील एक महत्त्वाचे नाव ठरला आहे. भारतीय परंपरेतील वस्त्रांना आधुनिक शैलीतील कलात्मक रूप देणारी डिझायनर म्हणून वैशाली यांची वैशिष्टय़पूर्ण ओळख फॅशन विश्वात आहे. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 6/

    पारंपरिक वस्त्रोद्योगाच्या कलात्मकतेशी नाते सांगतानाच वैशाली एस. हा ब्रॅण्ड जागतिक फॅशनमधल्या आधुनिकतेला आपलेसे करतो. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 7/

    वैशाली एस. हातमाग कारागिरांनाही फॅशनचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करीत आहेत. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 8/

    पैठणी, चंदेरी अशा पारंपरिक वस्त्रांना आधुनिक रूप देत वैशाली यांनी त्यालाही ग्लॅमर मिळवून दिले आहे. (छाया-प्रदीप दास)

  • 9/

    फॅशनविश्वातील वातावरण, त्याबाबतचे समज-गैरसमज यावरही वैशाली यांच्यासोबतच्या गप्पांमधून प्रकाश पडणार आहे. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 10/

    फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नेमक्या कुठल्या कौशल्यांची आवश्यकता असते, या क्षेत्रात करिअरच्या किती आणि कशा प्रकारच्या संधी आहेत, आव्हाने कोणती हे वैशाली त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांमधून उलगडेल. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 11/

    वस्त्रोद्योगाच्या कलात्मकतेशी नाते सांगतानाच वैशाली एस. हा ब्रॅण्ड जागतिक फॅशनमधल्या आधुनिकतेला आपलेसे करतो. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 12/

    भारतीय परंपरेतील वस्त्रांना आधुनिक शैलीतील कलात्मक रूप देणारी डिझायनर वैशाली एस. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 13/

    फॅशन डिझायनिंगमधील आव्हानांचाही वेध व्हिवा लाऊंजमध्ये. (छाया-अमित चक्रवर्ती)

  • 14/

    काही तरी वेगळे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अठराव्या वर्षी घराबाहेर पडलेल्या मराठमोळ्या तरूणीची कहाणी. (छाया-गणेश शिर्सेकर)

  • 15/

    वैशाली शडांगुळे मध्य प्रदेशातील विदिशामध्ये वाढलेली एक मराठमोळी मुलगी. (छाया-दिलीप कागडा)

  • 16/

    कोणतीही पार्श्वभूमी नसताना फॅशनविश्वातील झगमगत्या दुनियेचा भाग झालेल्या वैशाली यांची प्रेरणादायी कथा व्हिवा लाउंजमध्ये उलगडेल. (छाया-प्रदीप दास)

TOPICS
मध्यप्रदेशMadhya Pradesh

Web Title: Vaishali shadangule the celebrated designer

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.