-

१५ एप्रिल १९१२ रोजी अपघातग्रस्त झालेल्या 'टायटॅनिक' जहाजासारखेच एक जहाज निर्माण करण्यात येत आहे. २०१८ साली हे जहाज प्रवासासाठी सज्ज होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. चीन ते दुबई असा प्रवास करणारे 'टायटॅनीक २' हे जहाज हुबेहुब जुन्या 'टायटॅनीक' जहाजाप्रमाणे असून, जुन्या आणि नवीन जहाजात तांत्रिकबाबी सोडल्यास कोणताही फरक अढळून येत नाही. पुढील स्लाईडमध्ये पाहा नवीन जहाजातील अंतर्गत विभागांची छायाचित्रे. (Source: http://bluestarline.com.au/)
-
नव्या जहाजात जुन्या जहाजाप्रमाणेच प्रथम, द्वितिय आणि तृतिय श्रेणी असेल. त्याशिवाय जुन्या जहाजाप्रमाणेच तरण तलाव आणि भव्य जिना असेल. १९९७ सालच्या 'टायटॅनिक' या गाजलेल्या हॉलिवूडपटात अशाच प्रकारचा देखावा निर्माण करण्यात आला होता. (Source: http://bluestarline.com.au/)
-
हे जहाज कधीही बुडणार नाही असा दावा जुन्या 'टायटॅनिक'च्या निर्मितीदरम्यान करण्यात आला होता. तरीदेखील एका हिमनगाला धडकून या जहाजाला अपघात होऊन ते पाण्यात बुडाले. या अपघातात जहाजावरील पंधराशे लोकांना आपले प्राण गमवावे लागले. 'टायटॅनिक'ची भव्यदिव्यता आणि करूण कहाणी साकारणाऱ्या याच नावाच्या हॉलिवूडपटाने जगभरात प्रसिध्दी मिळवली. (Source: http://bluestarline.com.au/)
-
'टायटॅनिक २' च्या निर्मितीचे शिवधनुष्य ऑस्ट्रेलियन अब्जाधिश क्लाइव्ह पामर आणि 'ब्लूस्टार लाईन' या त्यांच्या कंपनीने उचलले आहे. (Source: http://bluestarline.com.au/)
-
जुने जहाज उत्तर आर्यलंडमधील बेलफास्ट येथे निर्माण करण्यात आले होते, तर नव्या जहाजाची निर्मिती चीनमध्ये होत आहे. (Source: http://bluestarline.com.au/)
-
नव्या जहाजात २४०० प्रवासी प्रवास करू शकतील. दोन्ही जहाजांमधील मोठा फरक म्हणजे 'टायटॅनिक २' मध्ये अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली बसविण्यात आली आहे. (Source: http://bluestarline.com.au/)
-
'टायटॅनिक' अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी 'टायटॅनिक २' च्या निर्मितीबाबात नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे अनेकजण या जहाजातून प्रवास करण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र पाहायला मिळते. एका तिकिटासाठी बारा लाख डॉलर्स म्हणजेच ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजण्याची तयारी काहींनी दर्शवली आहे. (Source: http://bluestarline.com.au/)
-
सॅटेलाइट कंट्रोल, डिजिटल नॅविगेशन, रडार सिस्टममधील अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा संकटसमयी प्रवाशांना फायदेशीर ठरेल असाच आहे. याशिवाय जहाजाची रचना आणि अंतर्गत सजावटीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (Source: http://bluestarline.com.au/)
-
त्याचप्रमाणे प्रत्येक प्रवाशासाठी यात 'लाईफबोट'ची सोय असेल. जहाज हिमनगावर आदळल्यास आपातकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जहाजात गरजेनुसार महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. (Source: http://bluestarline.com.au/)
-
सध्याचे नियम आणि कायदे लक्षात घेऊन नवीन जहाज जुन्या जहाजापेक्षा चार मीटर अधिक रुंद बनविण्यात आले आहे. (Source: http://bluestarline.com.au/)
-
'टायटॅनिक २' ची अंतर्गतसजावट. (Source: http://bluestarline.com.au/)
-
'टायटॅनिक २' मधील तरण तलावाचे छायाचित्र. (Source: http://bluestarline.com.au/)
-
'टायटॅनिक २' मधील रेडिओ रुमचे छायाचित्र. (Source: http://bluestarline.com.au/)
-
'टायटॅनिक २' मधील धुम्रपान कक्ष. (Source: http://bluestarline.com.au/)
-
'टायटॅनिक २' मधील 'टर्किश बाथ' विभागाचे छायाचित्र. (Source: http://bluestarline.com.au/)
‘टायटॅनिक २’ सफरीसाठी आठ कोटी मोजायला तयार!
Web Title: Inside the new titanic 2 pictures people go crazy to ravel in fully functioning replica