-

World Press Photo : नॅशनल जिओग्राफीकचे छायाचित्रकार ख्रिस्टीएन झिगलर यांनी टिपलेल्या 'शॅमेलिऑन अंडर प्रेशर' या छायाचित्राला नेचर स्टोरी विभागात तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. (छाया सौजन्य- एपी)
-
World Press Photo : छायाचित्रकार अनुअर पॅटजेन फ्लोरिऊक यांनी टिपलेल्या व्हेल व्हिस्पर्स या छायाचित्राला नेचर सिंगल्स विभागात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मेक्सिकोच्या रेव्हिलेजिगेडो आईसलँड येथीस रोका पार्टिडा येथील समुद्रात हे छायाचित्र टिपण्यात आले आहे. (छाया सौजन्य- एपी)
-
World Press Photo : असोसिएटेड प्रेसचे छायाचित्रकार डॅनियल ओकोआ डे ओल्झा यांनी टिपलेल्या ला माया ट्रेडिशन या छायाचित्राला पीपल स्टोरीज विभागात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. स्पेनमध्ये वसंत ऋतूच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या करण्यात येणाऱ्या लास मयास फेस्टिव्हलसाठी माया म्हणून निवड झालेल्या मुलीची डॅनियल यांनी टिपलेली छबी डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. माया म्हणून निवड झालेल्या या मुलींना काही तासांसाठी फुलांची सजावट केलेल्या या मखरात बसून रहावे लागते. (छाया सौजन्य- एपी)
-
माऊरिको लिमा यांनी टिपलेल्या 'आयएस फायटर ट्रिटेड अॅट कुर्दिश हॉस्पिटल' या छायाचित्राला जनरल न्यूज सिंगल्स विभागात प्रथम पारितोषिक मिळाले. या छायाचित्रात आयसिसचा बंडखोर सैनिक जेकब याच्या भाजलेल्या शरीरावर डॉक्टर उपचार करताना दिसत आहेत. (छाया- एपी)
-
World Press Photo : मेरी एफ. काल्व्हर्ट यांनी टिपलेल्या 'सेक्शुअल असॉल्ट इन अमेरिकाज मिलिटरी' या छायाचित्राला लाँग टर्म प्रोजेक्टस विभागात प्रथम क्रमांक मिळाला. या छायाचित्रात दिसणारी डॅरलेन मॅथ्युज ही ज्येष्ठ महिला घर मिळण्याच्या प्रतिक्षेत असून गेली दोन वर्षे ती एका कारमध्ये राहत आहे. डॅरलेन १९७६मध्ये अमेरिकन लष्करात रुजू झाल्या होत्या. यानंतर त्यांना अल्बामा येथे पाठविण्यात आले होते. अल्बामात आल्यानंतर त्यांना येथील भयावह परिस्थितीची जाणीव झाली. अमेरिकन लष्करातून काढून टाकण्यात आल्यानंतर डॅरलेन यांच्या जीवनाची मोठी वाताहत झाल आणि त्यांना खूप नैराश्य आले. (छाया सौजन्य- एपी)
-
World Press Photo : सारा नाओमी लेवकोवीकझ यांनी टिपलेल्या 'एमिली अँड केट एडी अँड रेईड' या छायाचित्राला कंटेम्पररी इश्युज स्टोरी विभागत तिसरा क्रमांक मिळाला. (छाया सौजन्य- एपी)
-
World Press Photo : सर्जिओ तापिरो यांनी टिपलेल्या 'द पॉवर ऑफ नेचर' या छायाचित्राने नेचर सिंगल्स विभागात तिसरा क्रमांक मिळवला. मेक्सिकोतील कोलमिआ ज्वालामुखी फुटतानाचे हे छायाचित्र निसर्गाची शक्ती अधोरेखित करणारे आहे. (छाया सौजन्य- एपी)
-
World Press Photo : रोहन केली यांनी टिपलेल्या 'स्टॉर्म फ्रंट ऑन बोंडी बीच' या छायाचित्राने नेचर सिंगल्स विभागात पहिले पारितोषिक मिळवले. या छायाचित्रात सिडनीतील बोंडी समुद्रकिनाऱ्यावरच्या आकाशात त्सुनामीचे मोठे ढग दिसत आहेत. (छाया सौजन्य- एपी)
-
World Press Photo : नॅसी बोरोविक यांनी टिपलेल्या 'अ लाईफ इन डेथ' या छायाचित्राला लाँग टर्म प्रोजेक्टस विभागात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. नॅसी बोरविक यांनी या छायाचित्राच्या माध्यमातून होवी आणि लॉरेल बोरविक या दाम्पत्याच्या भावना टिपल्या आहेत. होवी आणि लॉरेल यांच्या लग्नाला ३४ वर्ष झाली असून या दोघांनाही चौथ्या टप्प्यातील कॅन्सर असल्याचे निदान एकाचवेळी झाले. नॅसी ही या दाम्पत्याची कन्या असून तिने मृत्यूला सामोरे जाताना आपल्या पालकांच्या नात्याचा प्रवास या छायाचित्रात टिपण्याचा प्रयत्न केला आहे. (छाया सौजन्य- एपी)
-
World Press Photo : समीर अल-डौमी यांनी टिपलेल्या 'आफ्टरमॅथ ऑफ एअरस्ट्राईक्स इन सिरीया' या छायाचित्राला स्पॉट न्यूज स्टोरी विभागात पहिला क्रमांक मिळाला. (छाया सौजन्य- एपी)
-
World Press Photo : टिम लॅमेन यांनी टिपलेल्या 'टफ टाईम फॉर ओरांगउटान' या छायाचित्राला नेचर स्टोरी विभागात प्रथम पारितोषिक मिळाले. (छाया सौजन्य- एपी)
-
World Press Photo : नॅशनल जिओग्राफीकचे छायाचित्रकार ख्रिस्टीएन झिगलर यांनी टिपलेल्या 'शॅमेलिऑन अंडर प्रेशर' या छायाचित्राला नेचर स्टोरी विभागात तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. (छाया सौजन्य- एपी)
World Press Photo : विजेती छायाचित्रे
Web Title: World press photo winners