-

आपल्या जोडीदारासोबत एका खास नाईट आऊटचे प्लॅनिंग करताना रोमॅण्टीक अंदाजासोबत काहीतरी नवे आणि थरारक अनुभव देणारे डेस्टिनेशन सॅन फ्रान्सिस्को येथे तयार करण्यात आले आहे. एअरबीएनबी ही हाऊस शेअरिंग कंपनी आणि पॅरिसमधील मत्स्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने एक खास अंडरवॉटर हाऊस तयार करण्यात आले आहे. येथे तुम्हाला शार्क मासे आणि पाण्याखालील जग जवळून पाहण्याचा आनंद घेता येतो. शिवाय, एक संपूर्ण रात्र येथे राहता येते. नवविवाहीत जोडप्यांसाठी हे खास डेस्टिनेशन तयार करण्यात आले आहे. (एपी)
-
पॅरिसमधील मत्सालयाच्या या अनोख्या अंडरवॉटर हाऊसमध्ये राहण्याची संधी मिळविण्यासाठी एअरबीएनबीने एका स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विजयी झालेल्या या ब्रिटीश जोडप्याला अंडरवॉटर हाऊसमध्ये राहण्याची संधी मिळाली. (एपी)
-
अंडरवॉटर हाऊसच्या भिंती काचेच्या असल्याने शार्क आणि पाण्याखालील सौंदर्य अगदी जवळून न्याहाळता येते. (एपी)
-
शार्क आणि पाण्याखालील सौंदर्य न्याहाळताना ब्रिटीश जोडपे. (एपी)
-
पॅरिसमधील हे मत्स्यालय १८६७ साली सुरू करण्यात आले होते. सुप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या अगदी समोरच्या बाजूलाच हे भव्य मत्स्यालय आहे. (एपी)
हम-तूम एक कमरे मै बंद हो..और शार्क आ जाए!!
आपल्या जोडीदारासोबत एका खास नाईट आऊटचे प्लॅनिंग करताना रोमॅण्टीक अंदाजासोबतच काहीतरी नवं आणि थरारक अनुभव देणारं डेस्टिनेशन सॅन फ्रान्सिस्को येथे तयार करण्यात आले आहे.
Web Title: Sleeping with the sharks at the aquarium de paris