गोध्रा दंगलींनंतर गुलबर्गा हौसिंग सोसायटीत झालेल्या हिंसाचारात काँग्रेसचे नेते एहसान जाफरी यांच्यासह ६९ जणांची जमावाने हत्या केली होती. २८ फेब्रुवारी २००२ मध्ये घडलेल्या घटनेवेळी सुमारे २० हजार जणांच्या जमावाने गुलबर्ग सोसायटीवर हल्ला करीत जाळपोळ केली होती. (Express Archive)
सन २००२मध्ये गोध्रा दंगलीनंतर गुलबर्ग हौसिंग सोसायटीत झालेल्या हिंसाचार आणि जळीतकांडप्रकरणी विशेष न्यायालयाने गुरुवारी २४ आरोपींना दोषी ठरवले. तर ३६ जणांची निर्दोष सुटका केली. सुमारे १४ वर्षांनंतर या प्रकरणात विशेष न्यायालयाने निकाल दिला. (Express Archive) या सोसायटीमध्ये १० इमारती आणि २९ बंगले होते. (Express Archive) सोयायटीमध्ये राहणारे बहुसंख्य मुस्लिमच होते. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाचा तपास केला. (Express Archive) ‘ जळीतकांडानंतर घटनास्थळी पोलीस तपास करताना (Express Archive) गुलबर्ग सोसायटी परिसरात जाळण्यात आलेली वाहने. (Express Archive)
गुलबर्ग सोसायटी जळीतकांड : फोटोतून पाहा नेमके काय घडले होते…
सन २००२मध्ये गोध्रा दंगलीनंतर गुलबर्ग हौसिंग सोसायटीत झालेल्या हिंसाचार आणि जळीतकांडप्रकरणी विशेष न्यायालयाने गुरुवारी २४ आरोपींना दोषी ठरवले. त्या दिवशी घटनास्थळी नेमके काय घडले होते त्याची छायाचित्रे…
Web Title: Revisiting gulberg massacre 24 convicted 36 acquitted