
डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली गेली. अमेरिकेचा इतिहास पाहता ही उमेदवारी फार महत्त्वाची आहे. कारण अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जगातील प्रभावशाली महिलांपैकी एक म्हणून त्याच्याकडे आदाराने पाहिले जाते. आयुष्यातील प्रत्येक संकटाना त्यांनी धैर्याने तोंड दिले. काही घटनांनी त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, तातल्या काही घटना पुढीलप्रमाणे लग्नापूर्वी १९७४ मध्ये हिलरी क्लिंटन या रोडिनो कमिटीच्या वकील होत्या. या कमिटीच्या कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर महाभियोग चालवला होता. १९८८ आणि १९९१ मध्ये अमेरिकेतल्या १०० प्रभावी वकिलांमध्ये हिलरी यांचे नाव होते. १९७५ मध्ये हिलरी यांनी बिल क्लिंटन यांच्यासोबत विवाह केला त्यानंतर १९७८ मध्ये बिल क्लिंटन आर्कन्सॉ प्रांतचे गव्हर्नर बनले तर हिलरी या आर्कन्सॉच्या फर्स्ट लेडी बनल्या. त्यावेळी आपल्या कामामुळे त्यांनी अनेकांची मन जिंकली. आर्कन्सॉ येथे अनेक शैक्षणिक उपक्रम त्यांनी राबवले होते. १९९१ मध्ये बिल क्लिंटन हे राष्ट्राध्यक्ष झाले आणि हिलरी या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी बनल्या. या काळात त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. राष्ट्रपती बनवण्यामागे हिलरींचा मोठा वाटा आहे असेही बिल क्लिंटन म्हणाले. -
१९९६ मध्ये क्लिंटन दाम्पत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची चौकशी देखील झाली. परंतु, नंतर मात्र त्यांच्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले नाही.
-
१९९६ मध्ये बिल क्लिंटन दुस-यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि हिलरी दुस-यांदा अमेरिकेच्या फर्स्ट लेडी झाल्या.
-
१९९७ मध्ये हिलरी यांना संगीतातला मानाचा समजला जाणारा ग्रँमी पुरस्कार मिळाला. त्याच्या 'इट टेक्स अ व्हिलेज' या ऑडिओ बुकसाठी त्यांना ग्रँमी पुरस्कार मिळाला.
१९९८ मध्ये त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात मोठे वादळ आले. बिल क्लिंटन यांच्यावर मोनिका लेविंस्की या त्यांच्या कनिष्ठ महिला सहकारी सोबत शरीरिक संबध ठेवल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणामुळे राजकिय वर्तुळात वादळ उठले होते पण हा आघातही हिलरी यांनी झेलला. पुढे त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांनी माहिती लिहिली आहे. २००२ मध्ये हिलरी यांनी पहिल्यांदा न्यूयॉर्क सिनेटची निवडणूक लढवली आणि त्या सिनेटर देखील झाल्या. यानंतर ख-या अर्थाने हिलरी यांची राजकारणातील घोडदौड सुरू झाली असे म्हणावे लागेल. २००३ मध्ये हिलरी यांनी आपले 'हार्ड चॉईस' हे आत्मचरित्र जगासमोर आणले. या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या. आतापर्यंतच्या राजकीय अनुभवावर आधारीत हे पुस्तक होते. या पुस्तकाद्वारे हिलरी यांनी आपला जीवनपटच जगासमोर खुला केला, -
२००८ मध्ये त्यादेखील राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. परंतु बराक ओबामा यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. पण बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हिलरी यांची परराष्ट्र मंत्री म्हणून निवड केली.
-
२०१६ मध्ये त्या पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरल्या, याच पक्षाच्या बर्नी सैडर्सकडून त्यांना विरोध झाला पण अखेर त्यांनी उमेदवारी मिळवून नवा इतिहास रचला. हिलरी यांची प्रचार मोहिमही काहीशी वादाच सापडली होती. परराष्ट्री मंत्री असताना त्यांनी लिहलेल्या काही ई- मेल्सवरून त्या चांगल्याच कात्रीत सापडल्या होत्या परंतु हे आरोप देखील त्यांनी शिताफिने परतवून लावले. नोव्हेंबरमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची चुरस रंगणार आहे यात त्या डोनाल्ड ट्रम्प यांना त्या टक्कर देणार आहेत
या घटनांनी दिली हिलरी क्लिंटनच्या आयुष्याला कलाटणी
Web Title: Intresting facts about hillary clinton