• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. ravana temple in india mppg

.. म्हणून देशातील या सात शहरांमध्ये होते रावणाची पूजा

October 8, 2019 16:11 IST
Follow Us
  • दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. परंतु आपल्या देशात काही ठिकाणी आजही रावणाची पूजा केली जाते. आज आपण आशाच काही मंदिरांची माहिती घेणार आहोत.
    1/8

    दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. परंतु आपल्या देशात काही ठिकाणी आजही रावणाची पूजा केली जाते. आज आपण आशाच काही मंदिरांची माहिती घेणार आहोत.

  • 2/8

    रावण मंदिर बिसारख – उत्तर प्रदेशातील नोएडा क्षेत्रात बिसारख नावाचे एक गाव आहे. हे गाव रावणाचे जन्मस्थान मानले जाते. या गावात रावणाचे मंदिर आहे. या मंदिरात ४२ फूट उंच शिवलिंग आहे. तसेच ५.५ फूट उंच रावणाची मूर्ती आहे. या गावातील लोक रावणाला महाब्रम्ह असे म्हणतात. या गावात दसऱ्याची दिवशी रावणाचे दहन केले जात नाही, उलट रावण दहनाचा शोक व्यक्त केला जातो.

  • 3/8

    बैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेशातील बैजनाथ येथील एका मंदिरात रावणाची पूजा केली जाते. पौराणिक कथांनुसार, रावण भगवान ब्रह्माचा नातू होता, तसेच तो कुबेरचा धाकटा भाऊ देखील होता. त्यामुळे एका विद्वान राजाला जाळणे योग्य नाही. अशी मान्यता येथील लोकांची आहे. म्हणून येथील लोक रावणाची पूजा करतात.

  • 4/8

    दशानन रावण मंदिर, कानपूर – कानपूरच्या दशानन मंदिरात हजारो लोक रावणाची पूजा करतात. शहराच्या शिवाला भागात बांधलेल्या शिव मंदिराला लागूनच रावणाचे मंदिर आहे. भगवान श्रीरामांनी स्वत: रावणाच्या ज्ञानाचा आदर केला होता. त्यामुळे या मंदिरात रावणाची पूजा केली जाते.

  • 5/8

    रावण मंदिर जोधपुर, राजस्थान – जोधपूरमधील मुद्गल ब्राह्मण रावणाचे वंशज मानले जातात. तसेच जोधपूर शहर मंदोदरी म्हणजेच रावणाच्या पत्नीचे मूळ स्थान मानले जाते. शहरातील चांदपोल परिसरातील महादेव अमरनाथ आणि नवग्रह मंदिर संकुलात रावण मंदिर आहे. या मंदिरात रावणा आराध्य देवता, शिव आणि देवी खुराना यांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत.

  • 6/8

    रावणग्राम रावण मंदिर, मध्य प्रदेश – मध्य प्रदेशातील रावणग्राम येथील लोक रावणाची पूजा करतात. येथे रावणाची सुमारे १० फूट उंच एक प्राचिन मुर्ती आहे. ही मूर्ती १४ व्या शतकातील आहे असे म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण देशात रामाची पूजा व रावणाचे दहन केले जाते मात्र, रावणग्राम मंदिरात "रावण बाबा नमः" असा जयघोष करत रावणाची पूजा केली जाते.

  • 7/8

    रावण रूंडी, मध्यप्रदेश – मध्यप्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यात रावणाची पूजा केली जाते. मंदसौर जिल्ह्यातील खानपूर भागातील एका मंदिरात दहा तोंडे असलेल्या रावणाची ३५ फूट उंच मूर्ती आहे. या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते.

  • 8/8

    काकीनाडा रावण मंदिर, आंध्र प्रदेश – आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे रावणाचे भव्य मंदिर आहे. या मंदिरात रावणाची पूजा केली जाते.

Web Title: Ravana temple in india mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.