• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. gorgeous and successful daughters of indian billionaires asy

ह्या आहेत भारतातील अब्जाधीशांच्या सुंदर आणि यशस्वी मुली

November 22, 2019 18:29 IST
Follow Us
  • रिलायन्स उद्योगसमूहाच्या मुकेश अंबांनी यांच्यापासून ते उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्यापर्यंत सर्वच भारतीय उद्योगपतींची नाव प्रत्येकांने ऐकलेलीच आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अब्जाधीश रुपयांची उलाढाल करणाऱ्या या उद्योजकांच्या मुलीही काही कमी नाहीत. त्यांनीही घरातून मिळालेला वारसा पुढं नेत वडिलांचं नाव मोठं केलं आहे
    1/9

    रिलायन्स उद्योगसमूहाच्या मुकेश अंबांनी यांच्यापासून ते उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्यापर्यंत सर्वच भारतीय उद्योगपतींची नाव प्रत्येकांने ऐकलेलीच आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अब्जाधीश रुपयांची उलाढाल करणाऱ्या या उद्योजकांच्या मुलीही काही कमी नाहीत. त्यांनीही घरातून मिळालेला वारसा पुढं नेत वडिलांचं नाव मोठं केलं आहे

  • 2/9

    अनन्या बिर्ला. बिर्ला उद्योगसमूहाचे अध्यक्ष असलेल्या कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या. अनन्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं आहे. ती क्युरोकार्ट घरातील हातमागाच्या सजावटीच्या वस्तू बनवणाऱ्या कंपनीबरोबरच एमपावर या मानसिक आजारांविषयी जागृती करणाऱ्या संस्थेची सहसंस्थापक आहे.

  • 3/9

    गायत्री रेड्डी. नामांकित माध्यम समूह असलेल्या डेक्कन क्रॉनिकलचे मालक वेंकटराम रेड्डी यांची मुलगी आहे. इंडियन प्रिमिअर लीगला सुरूवात झाल्यानंतर गायत्री रेड्डी यांनी टीम उभी करण्यात पुढाकार घेतला. खेळाडू निवडीपासून ते डेक्कन चार्जस संघाच्या फ्रँचायजीपर्यंत सगळं काम त्या करतात.

  • 4/9

    इशा अंबांनी. भारतातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबांनी आणि नीता अंबांनी यांची इशा कन्या आहे. इशा अंबांनी सध्या रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल या कंपन्याच्या मंडळावर आहेत.

  • 5/9

    लक्ष्मी मित्तल हे स्टील उद्योगातील उद्योजकांपैकी एक आघाडीचं नावं. वनिशा मित्तल ही त्यांची मुलगी. वनिशा ही एलएन मित्तल कंपनीची संचालक आहे.

  • 6/9

    आयेशा थापर. थापर उद्योगसमूहाचे मालक विक्रम थापर यांची कन्या. आयेशा ही सध्या इंडियन सिटी प्रॉपर्टीज् लिमिटेडची व्यवस्थापकीय संचालक आहे.

  • 7/9

    नंदिनी पिरॅमल या पिरॅमल उद्योगसमूहाची वारसदार आणि अजय पिरॅमल यांची मुलगी आहे. व्यवस्थापकीय शाखेतील पदवी घेतलेल्या नंदिनी या अनेक व्यावसायिक प्रोजक्टसाठी काम करतात. पिरॅमल एंटरप्राईजेसच्या एचआर विभागाच्या प्रमुख आहेत.

  • 8/9

    तान्या दुबाश या नामांकित गोदरेज उद्योगसमूहाचे अदी परामेश्वर गोदरेज यांची कन्या आहेत. त्या गोदरेज उद्योगांच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रॅण्ड अधिकारी आहेत.

  • 9/9

    गरवारे पॉलिस्टर तशी महाराष्ट्रातील माणसाला परिचयाची असलेली कंपनी. गरवारे पॉलिस्टरचे अध्यक्ष यांची कन्याही उद्योजक निघाली. सोनिया गरवारे या बोस्टन विद्यापीठातील एमबीए पदवीधर असून, सध्या गरवारे उद्योगसमूहात स्वतंत्र संचालक आहेत.

Web Title: Gorgeous and successful daughters of indian billionaires asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.