• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. people protest against violence inside the campus of jawaharlal nehru university bmh

‘जेएनयू’तील हल्ल्याच्या निषेधार्थ वांद्रेत हुंकार

आंदोलकांनी ‘हम देखेंगे, लाजिम है की हम देखेंगे’चे पोस्टर दाखवले

January 8, 2020 21:37 IST
Follow Us
  • दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून काही गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यार्थी, प्राध्यापकांना लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी मारहाण करत त्यांनी विद्यापीठातील साहित्याचंही प्रचंड नुकसानं केलं होतं. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेषी घोष हिच्यासह प्राध्यापक विद्यार्थी जखमी झाले होते. या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत असून, मुंबईतली वांद्रे येथेही बुधवारी रात्री आंदोलन करून निषेध करण्यात आला.
    1/9

    दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून काही गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यार्थी, प्राध्यापकांना लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी मारहाण करत त्यांनी विद्यापीठातील साहित्याचंही प्रचंड नुकसानं केलं होतं. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेषी घोष हिच्यासह प्राध्यापक विद्यार्थी जखमी झाले होते. या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत असून, मुंबईतली वांद्रे येथेही बुधवारी रात्री आंदोलन करून निषेध करण्यात आला.

  • 2/9

    जेएनयूमध्ये हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर पहिल्यांदा मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आलं होतं.

  • 3/9

    आंदोलनात लहान मुलांचाही सहभाग होता. विशेष म्हणजे फैज अहमद फैज यांच्या हम देखेंगे, लाजिम है की हम देखेंगे या कवितेतील ओळीचे पोस्टर झळकलेले दिसले. या कवितेवरून आयआयटी कानपूर येथे बराच वाद निर्माण झाला होता.

  • 4/9

    आंदोलक विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर आणि तोंड रूमालानं बांधून या हल्ल्याचा निषेध नोंदवला.

  • 5/9

    लहान मुलांनीही जेएनयूतील हल्ल्यासंदर्भातील पोस्टर आणि पोस्टकार्ड दाखवत लक्ष वेधून घेतलं.

  • 6/9

    जेएनयूमध्ये हल्ला करणाऱ्यांना अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे.

  • 7/9

    मोबाईलचे टॉर्च लावून आंदोलकांनी शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवत सरकार लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

  • 8/9

    वांद्रे येथे बुधवारी रात्री करण्यात आलेल्या आंदोलनात तरूणांसह विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी झाले होते.

  • 9/9

    जेएनयूतील हल्ल्यानंतर मुंबईत सातत्यानं आवाज उठविला जात आहे. बॉलिवूडमधील कलाकारांपासून सगळेच वेगवेगळ्या माध्यमातून हल्ल्याचा निषेध करत आहे. त्यात वांद्रेत झालेल्या आंदोलनाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

Web Title: People protest against violence inside the campus of jawaharlal nehru university bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.