• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. photographer captures a rare battle between eagle and fox over rabbit scsg

शिकार चोरण्याच्या नादात कोल्ह्यालाच घेऊन उडाला गरुड पण…

गरुड शिकारीसाठी जास्त कष्ट घेत नाहीत. आयत्या शिकारीवर त्यांचा डोळा असतो. पण…

February 21, 2020 14:30 IST
Follow Us
  • जंगलामध्ये रहायचं म्हणजे झुंज देता आली पाहिजे असं म्हटलं जातं. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेकदा न पाहिलेल्या लढायाही कॅमेरामध्ये कैद होतात. असंच काहीसं झालं लिव्हिंग वाईल्डनेस डॉट कॉमचा फोटोग्राफर असणाऱ्या केविन ईबीबरोबर. केविनने काढलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. केविनने एका लहान कोल्ह्याची आणि गरुडाची सश्याच्या शिकारीसाठी सुरु असणारी झुंज आपल्या कॅमेरात कैद केली आहे. (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))
    1/15

    जंगलामध्ये रहायचं म्हणजे झुंज देता आली पाहिजे असं म्हटलं जातं. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेकदा न पाहिलेल्या लढायाही कॅमेरामध्ये कैद होतात. असंच काहीसं झालं लिव्हिंग वाईल्डनेस डॉट कॉमचा फोटोग्राफर असणाऱ्या केविन ईबीबरोबर. केविनने काढलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. केविनने एका लहान कोल्ह्याची आणि गरुडाची सश्याच्या शिकारीसाठी सुरु असणारी झुंज आपल्या कॅमेरात कैद केली आहे. (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 2/15

    केविनने काढलेल्या फोटोमध्ये एक छोटा लाल रंगाचा म्हणजेच रेड फॉक्स प्रजातीचा कोल्हा आणि गरुड सश्यासाठी एकमेकांशी लढताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 3/15

    केविनने या सर्व घटनेचे वर्णन त्याच्या शब्दात केलं आहे. काय म्हणाला तो पाहुयात… (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 4/15

    "कोल्ह्याने सश्याची शिकार केली आणि तो आपली शिकार तोंडात पकडून गवतामधून जात होता. मी त्या कोल्हाला टिपण्यासाठी कॅमेरा सेट केला." (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 5/15

    "मी कॅमेरा सेट करत असताना मला माझ्या मागून एका गरुडाचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर गरुड वेगाने माझ्या दिशेने येत होते." (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 6/15

    "गरुड माझ्याकडे येत असता तरी त्या गरुडाची नजर सशावर होती हे माझ्या लक्षात आलं. मी कॅमेरा अजून झूम करुन सेट केला." (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 7/15

    त्यानंतर तिथं जे काही झालं ते पाहून केविनला धक्काच बसला. याबद्दल तो म्हणतो… (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 8/15

    "मला अपेक्षित होतं त्यापेक्षा अचंबित करणारं दृष्य मला पहायला मिळालं. कोल्ह्याचा आकार पाहून मला वाटलं कोल्हा आपली शिकार टाकून पळून जाईल आणि गरुडाला आरामात तो ससा मिळेल. गरुडाने कोल्ह्याच्या तोंड्यातील ससा आपल्या पंजामध्ये पकडला आणि उडण्यास तयार झाला. मात्र कोल्ह्याने आपल्या जबड्यातील ससा सोडलाच नाही." (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 9/15

    "मात्र गरुडाने लावलेल्या ताकदीमुळे त्याच्या पंजातील सशाबरोबर कोल्हाही जमीनीपासून काही अंतरावर उचलला गेला." (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 10/15

    कोल्हा जवळजवळ २० फूट हवेत उचलला गेल्याचं केविन सांगतो. (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 11/15

    "गरुड शिकारीसाठी जास्त कष्ट घेत नाहीत. आयत्या शिकारीवर त्यांचा डोळा असतो," असं केविन सांगतो. (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 12/15

    "काही दिवसांपूर्वीच मी एका कोल्ह्याच्या तोंडातून गरुडाने सशाची शिकार केल्याचे दृष्य कॅमेरात टीपले होते," असंही केविन म्हणाला. (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 13/15

    ही लढाई थक्क करणारी होती अशी प्रतिक्रियाही केविनने नोंदवली. (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 14/15

    मात्र या लढाईमध्ये कोण जिंकलं याचा खुलासा मात्र केविनने केला नाही. (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

  • 15/15

    तुम्हाला काय वाटतं कोण जिंकलं असेल या लढाईमध्ये? (फोटो सौजन्य: Kevin Ebi (LivingWilderness.com))

Web Title: Photographer captures a rare battle between eagle and fox over rabbit scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.