• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • अजित पवार
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. rafale vs j 20 ex iaf chief dhanoa calls chinas bluff with two simple questions dmp

J-20 समोर ‘राफेल’चा निभाव लागणार नाही म्हणणाऱ्या चीनला बी.एस.धनोआंनी विचारले फक्त दोन प्रश्न

July 31, 2020 18:13 IST
Follow Us
  • दोनच दिवसांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात 'राफेल' फायटर विमानांचा समावेश झाला. राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीने अंबाला एअरबेसवर लँडिंग केले. भारतात या नव्या फायटर विमानांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
    1/

    दोनच दिवसांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात 'राफेल' फायटर विमानांचा समावेश झाला. राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीने अंबाला एअरबेसवर लँडिंग केले. भारतात या नव्या फायटर विमानांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

  • 2/

    या फायटर जेट्समुळे भारताची शत्रुवर आघात करण्याची क्षमता कैकपटीने वाढली आहे. पण चीनला हे सत्य पचवणं जड जातंय. त्यामुळे चीनने आता पद्धतशीरपणे 'राफेल'ला कमी लेखण्याची मोहिम सुरु केली आहे.

  • 3/

    J-20 फायटर जेटसमोर 'राफेल' टिकणार नाही, हा चीनचा दावा माजी एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ यांनी शुक्रवारी खोडून काढला. ( फोटो सौजन्य -PTI)

  • 4/

    ग्लोबल टाइम्समध्ये तज्ज्ञांच्या हवाल्याने राफेल IAF कडे असलेल्या सुखोई-३० MKI पेक्षा सरस आहे. पण चीनच्या J-20 पेक्षा एक जनरेशन मागे आहे, असा दावा करण्यात आला आहे. ग्लोबल टाइम्स चिनी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र आहे.

  • 5/

    "राफेल फक्त एक चर्तुथांश जनरेशन अ‍ॅडव्हान्स आहे. गुणात्मक दृष्टया त्यात फार मोठे बदल नाहीयत" असे झांग शूफेंग याच्या हवाल्याने म्हटले होते. कम्युनिस्ट पार्टीच्या वेबसाइटनुसार झांग शूफेंग एक लष्करी विषयातील तज्ज्ञ आहे.

  • 6/

    "राफेल तिसऱ्या पिढीचे फायटर विमान असून चौथ्या पिढीच्या J-20 समोर त्याचा निभाव लागणार नाही" असे वेबसाइटने सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे. राफेल बाबत चीनकडून वाटेल तसा दिशाभूल करणारा प्रचार सुरु आहे.

  • 7/

    राफेल हे ४.५ जनरेशनचे फायटर विमान असून IAF साठी गेमचेंजर ठरणार असे माजी एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ यांनी म्हटले आहे. राफेलबाबत उलट-सुलट दावे करणाऱ्या चीनला त्यांनी फक्त दोन प्रश्न विचारले आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. Express Photos by Gurmeet Singh

  • 8/

    J-20 जर खरोखर इतकं शक्तीशाली, पाचव्या पिढीचं स्टेल्थ टेक्नोलॉजीच फायटर विमान आहे. मग त्यावर कॅनार्ड्स का बसवले आहेत? अमेरिकेचं F 22, F 35 आणि रशियाचं Su 57 यांच्यावर असे कॅनार्ड्स बसवलेले नाहीत याकडे धनोआ यांनी लक्ष वेधलं. F 22, F 35 आणि Su 57 ही पाचव्या पिढीची फायटर विमाने आहेत. विमान उचलण्यासाठी आणि नियंत्रणात सुधारणेसाठी मुख्य पंखाच्या पुढे हे कॅनार्ड्स लावलेले असतात.

  • 9/

    "J-20 पूर्णपणे स्टेल्थ आणि पाचव्या जनरेशनचं विमान मला तरी वाटत नाही कारण या विमानातील कॅनार्ड्समुळे रडारला सिग्नल मिळतात आणि राफेलमध्ये असलेल्या मिटिओर सारख्या दीर्घ पल्ल्याच्या मिसाइल्सला विमानाची पोझिशन समजते" असे धनोआ म्हणाले.

  • 10/

    J-20 पाचव्या पिढीचं फायटर विमान आहे, मग त्यात सुपरक्रूझची क्षमता का नाहीय? असा धनोआ यांनी दुसरा सवाल विचारला आहे. तुमच्या विमानामध्ये सुपरक्रूझ क्षमता असेल तर आफ्टरबर्नस वापरल्याशिवाय माच १ पेक्षा अधिक वेगाने उड्डाण करु शकते.

  • 11/

    "राफेलचे रडार सिग्नेचर आणि सुपरक्रूझ क्षमतेची जगातील सर्वोत्तम फायटर विमानांबरोबर तुलना होऊ शकते" असे धनोआ म्हणाले.

Web Title: Rafale vs j 20 ex iaf chief dhanoa calls chinas bluff with two simple questions dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.