-
मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत वंदे भारत ट्रेन तयार करण्यात आली आहे. (फोटो क्रेडीट – सौरभ राऊत व रेल्वे प्रवासी)
-
गुणवत्ता आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांविषयी (पॅसेंजर इंडेक्स) बोलायचे झाल्यास ट्रेनला ३.२ गुण देण्यात आले आहे. तर जागतिक स्तरावर २.९ गुण देण्यात आले आहे.
-
वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचमध्ये शुद्ध हवा पोहोचावी यासाठी फोटो कॅटेलिटिक अल्ट्रा व्हायलेट एअर प्युरिफिकेशन प्रणाली लावण्यात आली आहे.
-
ट्रेनध्ये सेल्फ प्रोपेल्ड इंजिन देण्यात आले आहे. म्हणजे ट्रेनला वेगळे इंजिन नाही. एक्झिक्युटिव्ह कोचच्या सीट १८० डिग्री पर्यंत फिरू शकतात.
-
वंदे भारत ट्रेनची पहिली रॅक बनवण्यासाठी १०० कोटींचा खर्च झाला होता. याला तयार करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागला.
-
तिकिटी विषयी बोलायचे झाले तर दिल्ली ते कटरा एसी चेयरकारची तिकीट १ हजार ६३० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेयरकारची तिकीट ३ हजार रुपये आहे.
-
वंदे भारत ट्रेनची सर्वोच्च स्पिड १८० किंमी आहे.
-
भारतात जपानची सिंकानसेन ई-५ सिरीजची बुलेट ट्रेन धावणार आहे. (source – loksatta)
-
पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान चालवली जाईल. (source – संग्रहित)
-
भारतात चालणाऱ्या बुलेट ट्रेनची गती ३२० किमी प्रति तास असेल. बुलेट ट्रेनमध्ये ८०० प्रवाशी एकसाथ प्रवास करू शकतात. प्रकल्प यशस्वी झाल्यावर सीट संख्या वाढून १ हजार २५० करता येऊ शकते. (संग्रहित छायाचित्र)
-
अजून बुलेट ट्रेनचे भाडे ठरवण्यात आलेले नाही. परंतु भारतीय रेल्वेनुसार भाडे फ्लाईटपेक्षा कमी राहील आणि राजधानी एसी २ टायरच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. (source – financial express)
-
बुलेट ट्रेनमध्ये एसी, टीव्ही, स्वयंचलित दरवाजे, वायफाय, प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन आदी उपकरणे असतील. (source – pixabay)
वंदे भारत विरुद्ध बुलेट ट्रेन; वेगवान आणि सुखद प्रवास देण्यात कोण अव्वल? जाणून घ्या..
देशात बुलेट्र ट्रेन येण्यापूर्वी वंदे भारत ट्रेनची जोरदार चर्चा आहे. ५ वी वंदे भारत ट्रेन काही दिवसांतच भारतीय रेल्वे रुळांवर वेग पकडणार आहे. अनेक मार्गावर ही ट्रेन उपलब्ध करण्याची योजना आहे. दरम्यान या ट्रेनची तुलना भविष्यात मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनशी केली जात आहे. वंदे भारत आणि बुलेट ट्रेनपैकी कोणती ट्रेन वेगवान आणि…
Web Title: Bullet train vs vande bharat train comparison ssb