-
पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. महाराष्ट्रात श्रावण महिना पवित्र महिना मानला जातो. पारंपारिक हिंदू कॅलेंडरमध्ये हा दहावा महिना आहे.
-
यंदा श्रावण महिना १८ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार २०२३ मध्ये अधिक मास आहे.
-
या पवित्र महिन्यात अनेक लोक भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात, उपवास करताना अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात, त्यापैकी ही अनोखी राजगिरा पनीर पराठा. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. (फ्रीपिक)
-
तरला दलाल या प्रसिद्ध शेफने ही रेसिपी शेअर केली आहे. ही राजगिरा पनीर पराठा रेसिपी उपवासाच्या वेळी तुम्हाला समाधानी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. (फ्रीपिक)
-
साहित्य: पनीर, बेसन, बटाटे, हिरवी मिरची, लिंबाचा रस, पिठीसाखर, धणे, उपवासाचं मीठ, मिरी पावडर (फ्रीपिक).
-
कृती : हा फराळी पराठा बनवण्यासाठी पनीर, हिरवी मिरची, लिंबाचा रस, पिठीसाखर, धणे, उपवासाचं मीठ मिक्स करून घ्या. एका भांड्यात बेसन बटाटे, मिरी पावडर आणि उपवासाचं मीठ मिक्स करून मऊ पीठ बनवा. (फ्रीपिक)
-
नॉन-स्टिक गरम करा आणि दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पराठ्याला थोडे तेल घाला, हिरवी चटणी आणि ताज्या दह्याबरोबर गरमागरम सर्व्ह करा.
-
हा पराठा तुम्हाला दिवसभर तृप्त ठेवेल, त्यात पनीर असल्याने शरीराला प्रोटीन मिळेल. (फ्रीपिक)
-
राजगिराचे अनेक फायदे आहेत. राजगिरामुळे हाडे मजबूत होतात आणि स्नायूंना चालना मिळते, प्रतिकारशक्ती वाढते आणि उच्च रक्तदाब कमी होतो. (फ्रीपिक)
श्रावणात उपवासाला बनवा झटपट राजगिरा पनीर पराठा, रेसिपी आहे एकदम सोपी!
श्रावणातील उपवास आता सुरू होतील. उपवासादिवशी रोज काय काय नवीन बनवायचं हा प्रश्न पडतो. तेव्हा राजगिरा पनीर पराठा एकदा नक्की ट्राय करा.
Web Title: Shravan fasting foods recipe marathi news health tips awareness ayurvedic life style ieghd import sgk