• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. gold price history 88 rupees during independence now rs 1 lakh gold rate journey marathi news rak

Gold Price History : १९४७ साली ८८ रुपये असलेलं सोनं १ लाखापर्यंत कसं पोहचलं? आजवर कशी झाली वाढ?

Gold Price History : सोन्याचा १० ग्रॅमचा भाव यंदा १ लाख रुपयांच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. पण गेल्या काही वर्षात सोन्याच्या किंमती कशा वाढत गेल्या याचा एक आढावा आपण घेणार आहेत.

July 15, 2025 16:49 IST
Follow Us
  • भारतात सोनं हा फक्त एक धातू नाही तर एक संस्कृती, परंपरा आणि गुंतवणुकीचे प्रतिक देखील आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते २०२५ पर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठा फरक पडला आहे. कधीकाळी ८८ रुपयांनी विकले जाणारे सोने आता १ लाखापर्यंत पोहचताना दिसत आहे.
    1/9

    भारतात सोनं हा फक्त एक धातू नाही तर एक संस्कृती, परंपरा आणि गुंतवणुकीचे प्रतिक देखील आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते २०२५ पर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठा फरक पडला आहे. कधीकाळी ८८ रुपयांनी विकले जाणारे सोने आता १ लाखापर्यंत पोहचताना दिसत आहे.

  • 2/9

    १९४७ मध्ये सोन्याचा भाव किती होता

    जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा १० ग्रॅम सोन्याची किंमत फक्त ८८.६२ रुपये इतकी होती. तेव्हा देखील दर लग्न सोहळ्यात सोने खरेदी केले जात असे.

  • 3/9

    १९५०-६० च्या दशकात थोडा फरक पडला

    १९५० मध्ये सोन्याची किंमत ९० ते ११२ रूपयांपर्यंत राहिली. १९६४ मध्ये ती पुन्हा ६३.२५ पर्यंत खाली आली, मात्र दशकाच्या उत्तरार्धात ते १७६ रुपये झाली.

  • 4/9

    १९७० मध्ये किंमतीत पहिली उसळी

    १९७० मध्ये सोन्याची किंमत १८४ रुपये, १९७५ मध्ये ५४० रुपये आणि १९७९ मध्ये ९३७ रुपये प्रति ग्र२म पोहचली. जगभरात आर्थिक चढ-उतार झाल्याने किंमतीत वाढ झाली.

  • 5/9

    २००८-२०१५ : आर्थिक संकटाच्या काळात सोन्याला झळाळी

    २००८ च्या जागतिक आर्थिक संकटादरम्यान सोन्याला सेफ हेवन मानले गेले. यामुळे किमतीमध्ये आणखीनच उसळी पाहायला मिळाली.

  • 6/9

    १९८० -१९९० मध्ये गुंतवणुकीत मोठी वाढ

    या काळात १९८० मध्ये किंमत १,३३३ रुपये, १९८५ मध्ये २,१३० रुपये आणि १९९० मध्ये सोन्याची किंमत ३,२०० प्रति ग्रॅम इतकी झाली. या काळात लोक सोन्याला गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहू लागले होते.

  • 7/9

    २००० च्या दशकात सोन्याची भरारी

    २०००मध्ये सोने ४,४०० रुपये, २००५ मध्ये ७,००० रुपये आणि २०१० पर्यंत प्रति ग्र२म १८,५०० रुपये प्रति ग्रॅम पर्यंत पोहचले. महागाई आणि वाढलेली गुंतवणूक यामुळे सोने अधिकच महाग होत गेले.

  • 8/9

    २०२० : करोना काळात विक्रमी वाढ

    करोना काळात सोन्यावर लोकांनी विश्वास दाखवला आणि याची किंमत ५०,००० ते ६०,००० च्या पुढे गेली.

  • 9/9

    २०२५ : १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाखाच्या पुढे

    इतिहासात पहिल्यांदाच सोन्याची किंमत १,००,००० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहचली. हा भारतीय गुंतवणूक इतिहासातील सर्वात मोठी वाढ होती.

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsसोनेGoldसोन्याच्या किमतीGold Prices

Web Title: Gold price history 88 rupees during independence now rs 1 lakh gold rate journey marathi news rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.