• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. in pictures how elon musks record pay package towers over nadella cook buffett and other ceos in us fehd import rak

एलॉन मस्क यांचे विक्रमी वेतन पॅकेज! अमेरिकेतील नाडेला, कुक, बफेट अशा सर्व बड्या सीईओंना टाकलं मागे

टेस्लाच्या बोर्डाने एलॉन मस्क यांच्या विक्रमी कॉर्पोरेट वेतन करारासाठी १ ट्रिलियन डॉलर्सचे भरपाई पॅकेज प्रस्तावित केले आहे, जे इतिहासातील सर्व सीईओच्या वेतनापेक्षा जास्त आहे.

September 8, 2025 16:25 IST
Follow Us
  • Elon Musk record pay package in comparison with other top CEO of US
    1/12

    टेस्लाच्या बोर्डाने एलॉन मस्क यांच्या विक्रमी कॉर्पोरेट वेतन करारासाठी १ ट्रिलियन डॉलर्सचे कंपन्सेशन पॅकेज प्रस्तावित केले आहे, जे इतिहासातील आजवर कोणत्याही सीईओला मिळालेल्या वेतनापेक्षा जास्त आहे.

  • 2/12

    याची व्याप्ती समजून घेण्यासाठी, मस्कच्या प्रस्तावित पॅकेजची तुलना आपण इतर अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांना मिळणाऱ्या कमाईशी करणे योग्य ठरेल. कंपनी फाइलिंग्ज, एलएसईजी डेटा, रॉयटर्स याबरोबरच सत्या नाडेला, टिम कुक ते वॉरेन बफेट यांच्याकडून संकलित केलेल्या डेटानुसार, जगातील काही मोठ्या कंपन्यांमधील सीईओंचे वेतन, स्टॉक परफॉर्मन्स आणि बाजार मूल्य याची यादी आपण पाहणार आहोत. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

  • 3/12

    मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला – नडेला यांनी ७१ दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत. या वर्षी त्यांना २०.५ स्टॉक वाढीसह ३.७ ट्रिलियन डॉलर्सच्या कंपनीचे नेतृत्व त्यांनी केले. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

  • 4/12

    अ‍ॅपलचे टिम कुक यांनी ७४.६ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. कुक हे -४.२% शेअर घसरणीनंतरही ३.५ ट्रिलियन डॉलर्सची कंपनी चालवतात. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

  • 5/12

    एनव्हीडियाचे जेन्सेन हुआन जी यांनी ४९.९ दशलक्ष डॉलर्स कमावले. यांच्या कंपनीने ४.१ ट्रिलियन डॉलर्सचे मार्केट कॅप मिळवले आणि यांचे शेअर्स २७.८% इतके वाढले. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

  • 6/12

    एली लिलीचे डेव्हिड रिक्स – $२९.२ दशलक्ष कमाई करून, $७०३ अब्ज फार्मा दिग्गज कंपनीला -३.८% च्या शेअर घसरणीतून बाहेर काढले. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

  • 7/12

    मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी २७.२ दशलक्ष डॉलर्स कमावले. इतकेच नाही तर त्यांच्या कंपनीने जवळजवळ २८% शेअर नफा मिळवला. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

  • 8/12

    व्हिसाचे रायन मॅक्लनर्नी – $२६ दशलक्षच्या भरपाईने, $६७६ अब्ज पेमेंट फर्मला दिशा मिळाली आणि स्टॉक ११.१% ने वाढला. (छायाचित्र स्रोत: लिंक्डइन)

  • 9/12

    अल्फाबेटचे सुंदर पिचाई – १०.७ दशलक्ष डॉलर्स कमावले. पिचाई हे २.८ ट्रिलियन डॉलर्स मुल्य असलेल्या गुगलची पॅरेंट कंपनी चालवतात, ज्या कंपनीचा स्टॉक २७.७% ने वाढला. (छायाचित्र स्रोत: लिंक्डइन)

  • 10/12

    ब्रॉडकॉमचा हॉक टॅन – २.६ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली, त्यांच्या १.४४ ट्रिलियन डॉलर्सच्या चिपमेकर कंपनीने या वर्षी ३२% वाढ केली. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

  • 11/12

    अमेझॉनचे अँडी जॅसी – १.६ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. जॅसी हे २.५ ट्रिलियन डॉलर्सच्या कंपनीचे संचालक आहेत, त्यांच्या कंपनीच्या स्टॉकमध्ये या वर्षी ७.४% वाढ झाली आहे. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

  • 12/12

    बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट – यांनी फक्त $०.४ दशलक्ष रुपये कमावले, तरीही ते स्थिर ८.१% परताव्यासह $१.०९ ट्रिलियनचे साम्राज्य चालवतात. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: In pictures how elon musks record pay package towers over nadella cook buffett and other ceos in us fehd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.