-
भारतात रुपया वापरला जातो, तर अमेरिकेत डॉलर वापरला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचं स्वतःचं चलन असतं. बहुतेक देशांमध्ये फक्त एकच चलन असतं. तथापि, जगात असा एक देश आहे जिथे एक नाही, दोन नाही तर तीन प्रकारचे वेगवेगळे चलन वापलं जातं. (Photo: Pexels)
-
आजकाल चर्चेत असलेल्या पॅलेस्टाईनमध्ये तीन प्रकारचं चलन वापरलं जातं. इस्रायल आपल्या सर्व शक्तीनिशी हमासला संपवण्याचा प्रयत्न करत असताना, त्याचे मित्र राष्ट्र ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल आणि फ्रान्स यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. (Photo: Unsplash)
-
पॅलेस्टाईनचं स्वतःचं अधिकृत चलन नाही. सध्या वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये तीन वेगवेगळी चलने वापरली जातात: इस्रायली शेकेल (ILS), अमेरिकन डॉलर (USD) आणि जॉर्डनियन दिनार (JOD). (Photo: Pexels)
-
पॅलेस्टाईनमध्ये तीन वेगवेगळे चलन असण्याची अनेक कारणे आहेत. पहिलं म्हणजे त्याचं स्वतःचं राष्ट्रीय चलन नाही. तो स्वतंत्र आणि सार्वभौम देश नाही, याचा अर्थ तो स्वतःचं चलन छापू शकत नाही आणि नियंत्रित करू शकत नाही. (Photo: Freepik)
-
इस्रायली चलन वापरण्यामागील कारण काय? १९९० च्या ओस्लो करारामुळे पॅलेस्टाईनमध्ये इस्रायली चलन वापरले जाते. या करारानुसार, पॅलेस्टाईनमधील मोठ्या व्यवहारांसाठी इस्रायली चलन, शेकेल वापरले जाईल. परंतु, इस्रायलची अर्थव्यवस्था त्यांच्या नियंत्रणाखाली येऊ नये म्हणून, दिनार आणि डॉलरचा वापरही होऊ लागला. (Photo: Unsplash)
-
१९४८ मध्ये जेव्हा इस्रायल वेगळा देश बनला, तेव्हा वेस्ट बँक जॉर्डनने ताब्यात घेतली, ज्यामुळे हे चलन अधिकृत चलन बनले. १९६७ मध्ये इस्रायलने वेस्ट बँक ताब्यात घेतल्यानंतरही दिनारचा वापर सुरूच राहिला. (Photo: Pexels)
-
पॅलेस्टाईन दीर्घकाळापासून गरिबीशी झुंजत आहे आणि त्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात परदेशी मदतीवर अवलंबून आहे. पॅलेस्टाईनची बहुतेक आर्थिक मदत डॉलरच्या स्वरूपात आहे. अमेरिका, युरोप, संयुक्त राष्ट्रे आणि इतर संस्था पॅलेस्टाईनला डॉलरमध्ये मदत पाठवतात, म्हणूनच लोक हे चलन देखील वापरतात. (Photo: Pexels)
Country with Three Currencies: जगातील कोणत्या देशात तीन प्रकारचं चलन वापरलं जातं? जाणून घ्या!
जगात असा एक देश आहे जिथे एक नाही, दोन नाही तर तीन प्रकारचे वेगवेगळे चलन वापलं जातं.
Web Title: Country with three currencies which region of the world uses three types of currency find out in marathi news gkt