• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. despite centuries of research science has not been able to answer these questions what are these 7 mysteries find out gkt

Unsolved Secrets: शतकानुशतकं संशोधन करूनही विज्ञान ‘या’ प्रश्नांची उत्तरं देऊ शकलं नाही; काय आहेत ६ रहस्ये?

Unsolved Secrets: विज्ञानाने आज आपलं जीवन खूप सोपं केलं आहे. विश्व, शरीर आणि तंत्रज्ञानाशी संबंधित हजारो रहस्ये उलगडली आहेत. पण अजूनही काही रहस्ये आहेत जी समजण्यापलीकडे आहेत. त्याविषयी जाणून घेऊयात.

October 22, 2025 18:50 IST
Follow Us
  • Unsolved Secrets
    1/8

    विज्ञानाने मानवांना चंद्रावर नेलं, डीएनएचे कोड उलगडले पण आजही काही रहस्ये आहेत ज्यांची उत्तरे शास्त्रज्ञांना अजूनही सापडत नाहीत.(Photo Source: Pexels)

  • 2/8

    मानवी वर्तन, शरीर आणि निसर्गाशी संबंधित काही गोष्टींवर वर्षानुवर्षे संशोधन सुरू आहे, तरीही काही गोष्टींबाबत गूढ कायम आहेत. अशा सात प्रश्नांचा शोध घेऊया.(Photo Source: Pexels)

  • 3/8

    आपण स्वप्ने का पाहतो? : झोपेत असताना मेंदू अनेक कथा तयार करतो, कधी विचित्र, कधी भयानक आणि कधी सुंदर. पण विज्ञानाला अजूनही हे समजलेलं नाही की आपण स्वप्ने का पाहतो. काहीचं म्हणणं की आपल्या मेंदूच्या भावनांवर प्रक्रिया करण्याच्या आणि आठवणी साठवण्याच्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे. (Photo Source: Pexels)

  • 4/8

    आपण वृद्ध का होतो? : आपल्या पेशी कालांतराने कमकुवत होतात, पण प्रश्न असा आहे की, एखादी व्यक्ती पूर्णपणे निरोगी आयुष्य जगली तरीही वृद्धत्व का येतं? शास्त्रज्ञांना अद्याप याचं कारण सापडलेलं नाही.(Photo Source: Pexels)

  • 5/8

    व्हेल मासे स्वतःहून किनाऱ्यावर का येतात? : जगभरात अनेक वेळा असं दिसून आलं की डझनभर व्हेल एकत्र किनाऱ्यावर येतात आणि मरतात. शास्त्रज्ञांनी अनेक कारणे शोधली, परंतु त्यापैकी एकही कारण निर्णायकपणे सिद्ध झालेलं नाही. (Photo Source: Pexels)

  • 6/8

    लोक अलार्म वाजण्यापूर्वीच का उठतात? : तुम्ही कधी लक्षात घेतलं का की कधीकधी आपण अलार्म वाजण्यापूर्वी काही सेकंद आधी डोळे उघडतो? असं का घडतं? की हा फक्त एक योगायोग आहे? अद्याप हे गूढ उलगडलेलं नाही. (Photo Source: Pexels)

  • 7/8

    एक हात अधिक मजबूत का असतो? : जगातील सुमारे ९० टक्के लोक उजवे आहेत, तर उर्वरित डावे आहेत. पण आपलं शरीर एका हाताला दुसऱ्या हातापेक्षा जास्त का प्राधान्य देतं? आतापर्यंत कोणतंही ठोस उत्तर सापडलेलं नाही.

  • 8/8

    एकाने जांभई दिली तर दुसऱ्याला का येते? : जर तुमच्या जवळच्या एखाद्याला जांभई आली तर तुम्हाला काही सेकंदातच जांभई येऊ शकते. जर तुम्हाला एखाद्याचा जांभई येत असलेला फोटो किंवा व्हिडिओ दिसला तरही असे होऊ शकते. यांचं नेमकं कारण अद्याप अज्ञात आहे.

TOPICS
विश्लेषण विज्ञान तंत्रज्ञानExplained Sci & Tech

Web Title: Despite centuries of research science has not been able to answer these questions what are these 7 mysteries find out gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.