Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2018 csk beat srh in final by 8 wickets watch exclusive images of final match played at wankhede stadium in mumbai

मुंबईत चेन्नई ‘एक्स्प्रेस सुस्साट’! पाहा अंतिम फेरीत चेन्नईच्या विजयाची खास क्षणचित्रे

हैदराबादवर ८ गडी राखून मात करत चेन्नईने अकराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, श्रीवत्स गोस्वामी धावबाद होऊन माघारी परतला. मात्र यानंतर कर्णधार केन विल्यमसनने शिखर धवन व अन्य फलंदाजांना सोबत घेऊन आपल्या संघाचा डाव सावरला.
    1/10

    सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, श्रीवत्स गोस्वामी धावबाद होऊन माघारी परतला. मात्र यानंतर कर्णधार केन विल्यमसनने शिखर धवन व अन्य फलंदाजांना सोबत घेऊन आपल्या संघाचा डाव सावरला.

  • 2/10

    मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने हैदराबादच्या फलंदाजांना बाद करण्याचा सपाटा सुरुच ठेवला. याच कारणामुळे हैदराबादचे फलंदाज मोठी भागीदारी उभारु शकले नाहीत.

  • 3/10

    मधल्या फळीत युसूफ पठाणने फटकेबाजी करत सनराईजर्स हैदराबाद संघाला सामन्यात परत आणलं.

  • 4/10

    युसूफ पठाणचा साथीदार कार्लोस ब्रेथवेटनेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

  • 5/10

    हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर फाफ डु प्लेसिस संदीप शर्माच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला.

  • 6/10

    मात्र यानंतर सुरेश रैना-शेन वॉटसन जोडीने चेन्नईचा डाव सावरला. या दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. या भागीदारीमुळे हैदराबादचा संघ सामन्यात बॅकफूटलला ढकलला गेला.

  • 7/10

    शेन वॉटसनने हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत शानदार शतक झळकावलं.

  • 8/10

    सुरेश रैना माघारी परतल्यानंतर शेन वॉटसनने अंबाती रायडूच्या साथीने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

  • 9/10

    अंबाती रायडूने विजयी फटका खेळल्यानंतर चेन्नईचा संघ मैदानात येऊन एकच जल्लोष करायला लागला.

  • 10/10

    अकराव्या हंगमाच्या विजेतेपदाची ट्रॉफीसोबत जल्लोष करणारा चेन्नईचा संघ. चेन्नईचं आयपीएलमधलं हे तिसरं विजेतेपद ठरलं आहे.

TOPICS
आयपीएल २०१८IPL 2018चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kings

Web Title: Ipl 2018 csk beat srh in final by 8 wickets watch exclusive images of final match played at wankhede stadium in mumbai

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.