• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. here is how much indian cricketers are paid for displaying stickers on their bats scsg

बॅटवर केवळ स्टीकर लावण्याचे इतके पैसे घेतात क्रिकेटपटू, आकडा पाहून थक्क व्हाल

बॅटवर स्टीकर लावूनही क्रिकेटपटू करतात कोटी कोटींची कमाई

January 13, 2020 15:12 IST
Follow Us
  • क्रिकेट आणि चित्रपट हे भारतीयांची दोन लोकप्रिय मनोरंजनाची माध्यमे आहेत. या श्रेत्रामध्ये करियर करण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. या श्रेत्रांमधील व्यक्तींना असणारी लोकप्रियता आणि या श्रेत्रांमधील कमाई ही दोन यामागील प्रमुख कारणे आहेत. खरोखरच या श्रेत्रातील व्यक्ती वेगवेगळ्या माध्यमातून कमाई करतात. आता आम्ही तुम्हाला सांगितलं की बॅटवरील स्टीकर्ससाठी क्रिकेटपटू करोडो रुपये घेतात. तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? अर्थात तुम्हाला त्यावर लगेच विश्वास बसणार नाही. पण खरोखर भारतीय संघातील अनेक खेळाडू केवळ बॅटवर ब्रॅण्डींग करण्यासाठी कोटी कोटींचे करार करतात. चला तर जाणून घेऊयात कोणता क्रिकेटपटू बॅटवरील जाहिरातीसाठी किती पैसे घेतात...
    1/9

    क्रिकेट आणि चित्रपट हे भारतीयांची दोन लोकप्रिय मनोरंजनाची माध्यमे आहेत. या श्रेत्रामध्ये करियर करण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. या श्रेत्रांमधील व्यक्तींना असणारी लोकप्रियता आणि या श्रेत्रांमधील कमाई ही दोन यामागील प्रमुख कारणे आहेत. खरोखरच या श्रेत्रातील व्यक्ती वेगवेगळ्या माध्यमातून कमाई करतात. आता आम्ही तुम्हाला सांगितलं की बॅटवरील स्टीकर्ससाठी क्रिकेटपटू करोडो रुपये घेतात. तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? अर्थात तुम्हाला त्यावर लगेच विश्वास बसणार नाही. पण खरोखर भारतीय संघातील अनेक खेळाडू केवळ बॅटवर ब्रॅण्डींग करण्यासाठी कोटी कोटींचे करार करतात. चला तर जाणून घेऊयात कोणता क्रिकेटपटू बॅटवरील जाहिरातीसाठी किती पैसे घेतात…

  • 2/9

    सुरेश रैना – बराच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेले नाव म्हणे सुरेश रैना. सुरेश रैना त्याच्या बॅटवर सीअॅटची जाहिरात करतो. यासाठी तो काही वर्षांपूर्वी अडीच ते तीन कोटी रुपये घ्यायचा.

  • 3/9

    युवराज सिंग – युवराज सिंगने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र आजही अव्वल डावखुऱ्या फलंदाजांमध्ये आवर्जून नाव घेतले जाते असा युवराज त्याच्या बॅटवर प्युमा या शूज कंपनीची जाहिरात करायचा. त्यासाठी तो चार कोटी रुपये घ्यायचा.

  • 4/9

    महेंद्र सिंग धोनी – भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. तो पुन्हा कधी मैदानावर दिसेल सांगता येत नाही. मात्र धोनी मागील काही वर्षांपासून त्याच्या बॅटवर स्पार्टनचे स्टीकर लावून जाहिरात करतो. यासाठी धोनी सहा कोटी रुपये घेतो.

  • 5/9

    रोहित शर्मा – मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि भारताचा सलामीवीर असणारा रोहित शर्मा आपल्या बॅटवर सीअॅट कंपनीची जाहिरात करतो. यासाठी तो काही वर्षांपूर्वी तीन कोटी रुपये घ्यायचा. मागील काही वर्षांमध्ये त्याच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे त्यामुळे तो आता नक्कीच बॅटवरील जाहिरातीसाठी तीन कोटींपेक्षा अधिक पैसे घेत असणार.

  • 6/9

    ए.बी. डिव्हिलियर्स – आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले आणखीन एक मोठे नाव म्हणून मीस्टर ३६० अर्थात ए.बी. डिव्हिलियर्स. तुफान फटकेबाजीसाठी लोकप्रिय असणारा डिव्हिलियर्स त्याच्या बॅटवरील जाहिरातीसाठी साडेतीन कोटी घ्यायचा.

  • 7/9

    शिखर धवन – भारताचा आणखीन एक धडाकेबाज फलंदाज म्हणजे शिखर धवन. आपल्या गब्बर अंदाजासाठी ओळखला जाणारा शिखरही विराटप्रमाणे बॅटवर एमआरएफची जाहिरात करतो. यासाठी तो वर्षाला ३ कोटी रुपये घेतो.

  • 8/9

    ख्रिस गेल – वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज म्हणजेच ख्रिस गेल. ज्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस पडतो असं म्हटलं जातं तो गेल बॅटवरील जाहिरातीसाठी तीन कोटी रुपये घ्यायचा.

  • 9/9

    विराट कोहली – तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा विराट हा स्वत:च्या बॅटवर एमआरएफ या टायर कंपनीची जाहिरात करतो. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही याच ब्रॅण्डची जाहिरात आपल्या बॅटवर करायचा. विराट आपल्या बॅटवर एमआरएफची जाहिरात करण्यासाठी वर्षाला आठ कोटी रुपये घेतो.

Web Title: Here is how much indian cricketers are paid for displaying stickers on their bats scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.