-
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत, भारतावर १० गडी राखून मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वॉर्नरने या सामन्यात नाबाद १२८ तर फिंचने नाबाद ११० धावा केल्या.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारत पाचव्यांदा दहा विकेटनी हरला आहे. १९८१ मध्ये भारताचा पहिल्यांदा दहा विकेटनं पराभव झाला होता. बलाढ्य ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच भारताचा दहा विकेटनं पराभव केला आहे. १९९७ मध्ये भारतीय संघाची कमान सचिन तेंडुलकरकडे होती. ब्रिजटाउनमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताला दहा गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. विडिंजच्या फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाज अपयशी ठरले होते. परदेशातही भारत जिंकू शकतो, याची जाणीव करून देणाऱ्या सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालीही भारताला दहा विकेटनं पराभव स्वीकारावा लागला आहे. २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतावर दहा गड्यांनी विजय मिळवला होता. -
२००५ मध्ये कोलकातामध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताचा दहा विकेटनं पराभव केला होता. यावेळी संघाचे नेतृत्व राहुल द्रवीडकडे होते. दक्षिण आफ्रिकेनं दोनदा भारताचा दहा गड्यांनी पराभव केला आहे.
१९८१मध्ये पहिल्यांदा भारताचा दहा गड्यांनी पराभव झाला होता. सुनिल गावस्करांच्या नेतृत्वातील भारतीय संघाला न्यूझीलंडने मेलबर्नमध्ये पराभवाचा धक्का दिला होता.
पाचव्यांदा भारत १० विकेटनी हरला, अशीच नामुश्की या कर्णधारांवर ओढवली होती
विराटसह पाच दिग्गज कर्णधारांवर दहा गड्यांनी पराभवची नामुष्की ओढावली होती.
Web Title: This five time india lose 10 wicket nck