• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 10 best opner batsmen middle order nck

या एका कारणामुळे दहा खेळाडूंचं करियर झालं हिट

कोणत्याही संघाच्या फलंदाजीचं भवितव्य सलामीच्या फलंदाजांवर अवलंबून असतं.

January 22, 2020 17:56 IST
Follow Us
    • कोणत्याही संघाच्या फलंदाजीचं भवितव्य सलामीच्या फलंदाजांवर अवलंबून असतं. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी किंवा धावसंखेचा पाठलाग करण्यासाठी सलामीच्या फलंदाजाची कामगिरी महत्वाची ठरते.
    • काही दिग्गज फलंदाजांनी आपल्या करियरची सुरूवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली. मधल्या फळीत हवं तसं यश मिळालं नाही. अशा फलंदाजांना सलामीला संधी मिळाल्यानंतर त्यांच्या करियरला वेगळीच दिशा मिळाली. सलामीला आल्यानंतर त्यांचं करियर सुसाट सुटलं. आज आपण अशाच खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत..ज्यांनी आपल्या करियरची सुरूवात मधल्या फळीत केली मात्र सलामीला खेळताना त्यांना यश मिळाले.
    • ऑस्ट्रेल्याचा स्फोटक सलामी फलंदाज एडम गिलख्रिस्टने आपल्या करियरची सुरूवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली. गिलख्रिस्टने हेडनसोबत सलामीला फलंदाजी करताना अनेक विक्रम केले. जगातील सर्वात धोकादायक सलामी फलंदाजामध्ये गिलख्रिस्ट -हेडन या जोडीचा समावेश होतो.
    • श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मार्वन अटापट्टूनेही आपल्या करियरची सुरूवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती. अवघ्या २० व्या वर्षी अटापट्टूनं श्रीलंकेच्या संघात स्थान मिळवलं होतं. सुरूवातीला अटापट्टूने नवव्या स्थानावर फलंदाजी केली होती. १९९६ मध्ये जेव्हा अटापट्टूनेही जयसुर्यासोबत सलामीला फंलदाजी करायला सुरूवात केली तेव्हा त्याच्या करियला वेगळी दिशा मिळाली.
    • श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज तिलकरत्ने दिलशानने २००९ पर्यंत मधल्या फळीतील फलंदाज म्हणून भूमिका बजावली. २००९ नंतर श्रीलंकेसाठी सलामीचा फलंदाज म्हणून भूमिका पार पाडली.
    • विंडिजचा धाकड फलंदाज ख्रिस गेलनेही मधल्या फळीतील फलंदाज म्हणून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना गेलला फारसं यश मिळालं नाही. २००० मध्ये पहिल्यांदा गेलनं विडिंजकडून सलामीला फलंदाजी केली. तेव्हापासून गेल सलामीचा फंलदाज म्हणून उदयास आला.
    • श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज सनथ जयसुर्यानं आपल्या क्रिकेट करियरची सुरूवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती. १९८९ मध्ये जयसुर्यानं ऑस्ट्रेलियाविरोधात पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्यानं पाचव्या स्थानावर फलंदाजी केली होती. या सामन्यात जयसुर्यानं फक्त तीन धावा केल्या होत्या. १९९९ मध्ये जयसुर्यानं पहिल्यांदाच श्रीलंकेकडून सलामीला फलंदाजी केली. या सामन्यात त्यानं ७७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर जयसुर्या श्रीलंकेचा सलामी फलंदाज म्हणून खेळला.
    • ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू जस्टिन लँगरची सुरूवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून झाली होती. लँगरला पहिल्या सहा वर्षांत फक्त आठ कसोटी सामने खेळाता आले. हेडनबरोबर सलामीला फलंदाजी करणं लँगरच्या क्रिकेट करियरमधील टर्निंग पॉईंट ठरला.
    • 1/12

      ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णाधार मार्क वॉनेही आपल्या करियरची सुरूवात मधल्या फळीतील फंलदाज म्हणून केली होती. मार्क वॉने १९९६ मध्ये गिलख्रिस्टसोबत सलामीला फलंदाजी केली. तेव्हापासून त्याचं करियर सुसाट सुटलं. २००२मध्ये मार्क वॉनं निवृत्ती घेतली.

    • 2/12

    • 3/12

      विरेंद्र सेहवाग

    • क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर याच्या नावावर फलंदाजीतील अनेक विक्रम आहेत. एकदिवसीय सामन्यातील उत्कृष्ट सलामी फलंदाज म्हून सचिन तेंडुलकरला ओळखलं जातं. सचिनने आपल्या क्रिकेट करियरची सुरूवात पाचव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून केली. पहिल्या ७८ सामन्यात सचिनला एकही शतक झळकावता आलं नाही. पण, १९९४ मध्ये सचिनने अजय जाडेजासोबत भारतासाठी सलामी केली. तेव्हापासून सचिनचं क्रिकेट करियर सुसाट धावलं.

Web Title: 10 best opner batsmen middle order nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.