-
जगभरात सध्या करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. इटली, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यासारखे विकसीत देशही या विषाणूच्या विळख्यात आले आहेत. अफगाणिस्तानातही करोनामुळे भीषण परिस्थिती आहे. या कठीण काळात अफगाणी क्रिकेटपटू हश्मतुल्ला शहीदीने स्वतः रस्त्यावर उतरत अन्नदान करतोय.
-
हश्मतुल्लाने गरजूंसाठी अन्नधान्याची पाकीट व इतर गरजेच्या वस्तू जमा केल्या आहेत.
-
या सर्व वस्तू तो स्वतः आपल्या गाडीत भरुन रस्त्यांवरील बेघर आणि गरजू लोकांमध्ये वाटप करतो आहे.
-
सध्याच्या खडतर काळात प्रत्येक गरिब व्यक्तीपर्यंत मदत पोहचवणं हे आपलं कर्तव्य असल्याचं हश्मतुल्लाने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
त्याच्या या कामासाठी सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघातील त्याचा सहकारी राशिद खाननेही हश्मतुल्लाचं कौतुक केलंय.
-
२०१३ साली केनियाविरुद्ध वन-डे सामन्यात हश्मतुल्लाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
-
आतापर्यंत हश्मतुल्लाने ३ कसोटी, ३९ वन-डे आणि एका टी-२० सामन्यात आपल्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
-
फोटो सौजन्य – फेसबूक अकाऊंट
करोनाशी लढा : अफगाणी क्रिकेटपटू रस्त्यावर उतरून करतोय अन्नदान
प्रत्येक गरजू व्यक्तीला अन्न मिळणं हे आपलं कर्तव्य
Web Title: Afghanistan cricketer hasamtulla shahidi helping poor people in country to fight against corona virus psd