-
एकदातरी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करायला मिळावं अशी देशातल्या प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते.
-
काही खेळाडू यात यशस्वी होतात तर काहींना संधीच मिळत नाही. अनेक खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा लाभ घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं नाव मोठं केलं.
-
आज आपण पदार्पणाच्या वन-डे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांविषयी माहिती करुन घेणार आहोत.
-
३) ब्रजेश पटेल – २१ कसोटी आणि १० वन-डे सामन्यांचा अनुभव असलेल्या ब्रजेश पटेल यांनी वन-डे सामन्यातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १३ जुलै १९७४ मध्ये पटेल यांनी इंग्लंडविरुद्ध लीड्स च्या मैदानावर पदार्पण केलं. या सामन्यात ब्रजेश पटेल यांनी ८२ धावांची खेळी केली होती. यानंतर त्यांची कामगिरी खालावत गेल्यामुळे त्यांना संघात फारसं स्थान मिळालं नाही. सध्या पटेल आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष आहेत.
-
२) रॉबिन उथप्पा – १५ एप्रिल २००६ रोजी उथप्पाने इंदूर वन-डे सामन्यात इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात उथप्पाने ८६ धावांची खेळी केली होती. उथप्पाचा वन-डे मधली ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. आतापर्यंत ४६ वन-डे सामन्यांमध्ये उथप्पाने भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१५ नंतर उथप्पाला भारतीय संघात स्थान मिळालं नाही.
-
१) लोकेश राहुल – ११ जून २०१६ रोजी राहुलने झिम्बाब्वेविरुद्ध हरारे वन-डे सामन्यात पदार्पण केलं. या सामन्यात त्याने नाबाद १०० धावांची खेळी केली होती. पदार्पणाच्या वन-डे सामन्यात शतक झळकावणारा राहुल एकमेव भारतीय खेळाडू आहे. यानंतर राहुल सातत्याने भारतीय संघात आपलं स्थान टिकवत आला आहे.
पदार्पणाचा वन-डे सामना गाजवणारे ३ भारतीय फलंदाज
Web Title: Top 3 indian players with most runs in htheir odi debut psd