-
क्रिकेटच्या मैदानातच दुखपत किंवा इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या खेळाडूंबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. क्रिकेट विश्वातील अनेक तारे असे सामना सुरू असताना निखळले. त्यांच्या दुर्देवी जाण्यामुळे क्रीडा चाहते सुन्नही झाले होते…
-
२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा २६ वर्षीय फिलिप ह्यूज या खेळाडूचा सामन्यादरम्यान मृत्यू झाला. सामन्यात एबॉट या गोलंदाचा बाउंसर फिलिपच्या डोक्यावर आदळला. त्यानंतर तीन दिवसापर्यंत फिलिप कोमात होता. २७ नोव्हेंबर २०१४ रोजी फिलिप ह्यूचचा मृत्यू झाला.
-
पाकिस्तानचे युवा क्रिकेटर जुल्फिकार भट्टी यांचा वयाच्या २२ व्या वर्षी छातीवर चेंडू लागून मृत्यू झाला. स्थानिक सामन्यादरम्यान एक चेंडू त्यांच्या छातीवर येऊन आदळला. त्याच क्षणी ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं.
-
इंग्लंडचे विल्फ स्लॅक १९८९ मध्ये गांबियातील एका स्थानिक सामन्यात मैदानावर कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. या आधीसी स्लॅक चारवेळा बेशुद्ध पडले होते. शेवटपर्यंत डॉक्टरांना स्लॅकच्या मृत्यूचं कारण समजले नाही. वयाच्या ३४ व्या वर्षी स्लॅक यांचा मृत्यू झाला.
-
दक्षिण अफ्रीकाचे डेरिन रँडाल यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झाले. २०१३ मध्ये स्थानक सामन्यात फलंदाजी करताना त्यांना एक चेंडू लागला. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं.
-
इंग्लंड संघातील जॉर्ज समर्स यांचा मृत्यू डोक्यावर चेंडू लागल्यामुळे झाला. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
-
१९५९ मध्ये पाकिस्तानचे अब्दुल अजीज यांचा कराची येथे स्थानिक सामन्यादरम्यान मृत्यू झाला. अब्दुल अजीज फलंदाजी करत असताना त्यांच्या छातीवर एक चेंडू जोरात आदळला. अवघ्या १८ वर्षीय अजीज यांचा मृत्यू झाला.
-
भारताचे माजी खेळाडू रमन लांबा यांचाही क्रिकेटच्या मैदानावरच मृत्यू झाला. रमन लांबा प्वाइंटवर क्षेत्ररक्षण करत होते.त्यावेळी फलंदाजाने मारलेला चेंडू लांबा यांच्या डोक्यावर आदळला. त्यानंतर लांबा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
-
इग्लंडचे इयान फोली यांचा १९९३ मध्ये स्थानिक सामन्यादरम्यान मृत्यू झाला. एका सामन्यादरम्यान फोली यांच्या डोळ्याच्या खाली चेंडू लागला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान फोली यांचं हार्टअॅटकनं निधन झालं
-
२०१२ मध्ये इंग्लंडचे रिचर्ड ब्यूमोंट यांचं ३३ व्या वर्षी निधन झालं. सामन्यादरम्यान हार्ट अॅटकचा तीव्र झटका आल्यामुळे रिचर्ड यांचा मृत्यू झाला.
क्रिकेट खेळताना ‘या’ खेळाडूंचा मृत्यू; एका भारतीयाचाही समावेश
Web Title: Cricket players who died on cricket ground while playing asy