• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. jofra archer axed from manchester test for breaching coronavirus protocols here is what happened psd

संघातलं स्थान गमवावं लागण्याइतपत जोफ्रा आर्चरने केलं तरी काय??

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून मँचेस्टर येथे सुरुवात झाली. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या इंग्लंडच्या १३ जणांच्या संघात जोफ्रा आर्चरला संधी देण्यात आली होती. (फोटो सौजन्य - Reuters and AP)
    1/10

    इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून मँचेस्टर येथे सुरुवात झाली. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या इंग्लंडच्या १३ जणांच्या संघात जोफ्रा आर्चरला संधी देण्यात आली होती. (फोटो सौजन्य – Reuters and AP)

  • 2/10

    मात्र सामन्याआधी Bio Security नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी इंग्लंड संघ प्रशासनाने जोफ्रा आर्चरला दुसऱ्या कसोटीसाठी संघातून वगळलं.

  • 3/10

    करोना लॉकडाउन काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु करण्यासाठी आयसीसीने काही नियम आखून दिलेत, ते पाळणं प्रत्येक खेळाडूंना व संघाला बंधनकारक करण्यात आलंय.

  • 4/10

    परंतू आर्चरने नेमकं केलं तरी काय ज्यामुळे त्याला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं?? जाणून घेऊयात…

  • 5/10

    साऊदम्पटन येथील पहिली कसोटी संपल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या कसोटीसाठी मँचेस्टर येथे रस्ते मार्गाने रवाना झाला होता. प्रत्येक खेळाडूसाठी वेगळ्या गाडीची सोय इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केलेली होती.

  • 6/10

    फक्त खेळाडूंना या प्रवासात मध्ये कुठेही थांबण्याची परवानगी दिली नव्हती. पेट्रोल भरण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने खास पंप तर जेवणासाठी एका सुरक्षित मैदानावर सोय केली होती अशी माहिती The Guardian वृत्तपत्राने दिली.

  • 7/10

    मात्र मँचेस्टरला जात असताना जोफ्रा आर्चर Brighton येथील आपल्या घरी जाण्यासाठी वाटेत थांबला…हीच आर्चरची मोठी चूक ठरली.

  • 8/10

    इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाला बुधवारी संध्याकाळी या प्रकाराबद्दल समजलं…ज्यानंतर आर्चरवर तात्काळ कारवाई करत त्याला संघातून वगळण्यात आलं.

  • 9/10

    जोफ्रा आर्चरनेही घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली असून त्याने स्वतःला क्वारंटाइन केलं आहे.

  • 10/10

    माझ्यासकट सर्व संघाचा जीव मी धोक्यात घातला, याबद्दल मला खेद आहे. असा प्रकार पुन्हा होणार नाही, झालेल्या चुकीबद्दल मला माफ करा म्हणत आर्चरने माफी मागितली आहे.

Web Title: Jofra archer axed from manchester test for breaching coronavirus protocols here is what happened psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.