सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. २०१८पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली. मुंबईच्या पराभवाची कारणं काय असू शकतात पाहूयात…. (छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI) नाणेफेकीचा कौल सामन्यात महत्वाचा ठरला. दुसऱ्या डावात मुंबईच्या गोलंदाजांना दवाचा सामना करावा लागला. याशिवाय मुंबईच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात चूका केल्या आणि त्याचा भुर्डंद त्यांना सहन करावा लागला. रायडू आणि डु प्लेसिस यांचे झेल सोडले. दमदार सलामीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात मुंबईच्या फलंदाजांना अपयश आले. सौरभ तिवारीशिवाय एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही… रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड फलंदाजीमध्ये अपयशी ठरले…. चेन्नईच्या गोलंदाजांनी ठरावीक अंतराने बळी घेत मुंबईवर दडपड निर्माण केले… मोठे फटके मारण्याच्या नादात अखेरच्या षटकात मुंबईकडून एकही दर्जेदार फलंदाज मैदानात नव्हता. त्यामुळे अखेरच्या चार षटकांत मुंबईला धावा जोडता आल्या नाहीत. दोन्ही संघातील महत्वाचा फरक दर्जेदार फिरकी गोलंदाजी ठरली. मुंबईच्या राहुल चहर आणि कृणाल पांड्या गोलंदाजीत सपशेल अपयशी ठरले. चहरने चार षटकात ३६ धावा तर कृणालने ३७ धावा खर्च केल्या. मधल्या षटकात विकेट घेण्यात ही जोडी अपयशी ठरली. बुमराहचं अपयश मुंबईच्या पराभवाचं एक कारण ठरले आहे. मलिंगाच्या अनुपस्थितीत गोलंदाजीचा भार खांद्यावर असणारा बुमराह अपयशी ठरला. बुमराहने आपल्या चार षटकात ४३ धावा खर्च केल्या. शेन वॉटसन (५) आणि मुरली विजय (१) हे दोघे स्वस्तात बाद झाल्यानंतर सामन्यावर मिळवलेली पकड मुंबईच्या गोलंदाजांनी घालवली. रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीनं चेन्नईला विजय मिळवून दिला. अनुभवी अंबाती रायडूने संयमी खेळ करत ३३ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. रायडू ७१ धावांवर झेलबाद झाला. डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या. -
धोनीने अंतिम ११ संघात अतिरिक्त फलंदाज खेळवत फक्त ५ गोलंदाज खेळवले होते. त्यानं या गोलंदाजांना वापर चलाकीनं केला. त्याउलट रोहित शर्माकडे पर्याय उपलबद्ध असतानाही इतर गोलंदाजाचा वापर केला नाही. पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांना रोहित शर्मानं गोलंदाजी दिली नाही. बुमराह, कृणाल आणि राहुल महागडे ठरत असताना मधल्या षटकांत पोलार्ड किंवा हार्दिकचा वापर केला नाही.
या कारणामुळे मुंबईचा पराभव; रोहित यामधून धडा घेणार का?
Web Title: Dream 11 indian premier league ipl between the mumbai indians and the chennai superkings rohit dhoni nck