• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. eoin morgan appointed kkr captain as dinesh karthik steps down list of captains left captaincy mid season ipl rohit sharma virat kohli shreyas iyer vjb

IPL 2020: ‘या’ दिग्गजांना स्पर्धेच्या मध्यातच सोडावं लागलं होतं कर्णधारपद

८व्या घटनेतलं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का…

October 16, 2020 16:39 IST
Follow Us
  • IPL 2020 स्पर्धेत प्रत्येक संघाचे ७ किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळून झाले आहेत. या सामन्यांनंतर अजूनही सर्व ८ संघांमध्ये 'प्ले-ऑफ्स'साठी चुरस पाहायला मिळते आहे. (सर्व फोटो- IPL.com, सोशल मीडिया)
    1/

    IPL 2020 स्पर्धेत प्रत्येक संघाचे ७ किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळून झाले आहेत. या सामन्यांनंतर अजूनही सर्व ८ संघांमध्ये 'प्ले-ऑफ्स'साठी चुरस पाहायला मिळते आहे. (सर्व फोटो- IPL.com, सोशल मीडिया)

  • 2/

    कोलकाता संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी करत ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्यांचा संघ ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

  • 3/

    संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक मात्र अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. एक-दोन सामने वगळता त्याला फारशा धावा जमवता आलेल्या नाहीत.

  • 4/

    याचदरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाने हंगामाच्या मध्यातच कर्णधार बदलल्यामुळे चर्चा रंगली आहे.

  • 5/

    दिनेश कार्तिक कर्णधारपदावरून पायउतार झाला असून वन डे विश्वविषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन मुंबईविरूद्धच्या सामन्यापासून संघाचं नेतृत्व करणार आहे.

  • 6/

    हंगामाच्या मध्यातच कर्णधार बदलण्याची एखाद्या संघाची पहिलीच वेळ नाही. या आधीही काही संघांनी आपले कर्णधार विशिष्ट कारणासाठी स्पर्धेच्या मध्येच बदलले आहेत. पाहा कोणकोणत्या दिग्गजांना कर्णधारपद सोडावं लागलं होतं….

  • 7/

    १. २००८: व्ही व्ही एस लक्ष्मण –> अ‍ॅडम गिलक्रिस्ट (संघ – डेक्कन चार्जर्स | कारण – खराब कामगिरीमुळे स्वत:ला केलं संघातून बाहेर)

  • 8/

    २. २००८: हरभजन सिंग –> शॉन पोलॅक (संघ – मुंबई इंडियन्स | कारण – श्रीसंतला चपराक लगावल्यामुळे निलंबन)

  • 9/

    ३. २००९: केविन पीटरसन –> अनिल कुंबळे (संघ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | कारण – आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे स्पर्धेतून माघार)

  • 10/

    ४. २०१२: डॅनियल व्हेटोरी –> विराट कोहली (संघ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | कारण – खराब कामगिरीमुळे संघातून वगळलं)

  • 11/

    ५. २०१२: कुमार संगाकारा –> कॅमेरॉन व्हाईट (संघ – डेक्कन चार्जर्स | कारण – खराब कामगिरीमुळे स्वत:ला केलं संघाबाहेर)

  • 12/

    ६. २०१३: रिकी पॉन्टींग –> रोहित शर्मा (संघ – मुंबई इंडियन्स | कारण – संघाच्या खराब कामगिरीमुळे पदत्याग)

  • 13/

    ७. २०१४: शिखर धवन –> डॅरन सॅमी (संघ – सनरायझर्स हैदराबाद | कारण – खराब कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने केलं कर्णधारपदावरून दूर)

  • 14/

    ८. २०१५: शेन वॉटसन –> स्टीव्ह स्मिथ (संघ – राजस्थान रॉयल्स | कारण – खराब कामगिरीमुळे अचानक नाणेफेकीला वॉटसनऐवजी स्मिथ मैदानावर, स्मिथने नाणेफेकीच्या वेळी सांगितला बदल)

  • 15/

    ९. २०१६: डेव्हिड मिलर –> मुरली विजय (संघ – किंग्ज इलेव्हन पंजाब | कारण – कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे संघ व्यवस्थापनाचा कठोर निर्णय)

  • 16/

    १०. २०१८: गौतम गंभीर –> श्रेयस अय्यर (संघ – दिल्ली कॅपिटल्स | कारण – खराब कामगिरीमुळे स्वत:ला केलं संघाबाहेर)

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Eoin morgan appointed kkr captain as dinesh karthik steps down list of captains left captaincy mid season ipl rohit sharma virat kohli shreyas iyer vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.