-
नुकताच दसऱ्याचा सण पार पडला, परंतू आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत असणाऱ्या भारतीय खेळाडूंना आपल्या पारंपरिक पद्धतीने दसऱ्याचा सण साजरा करता आला नाही. मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने आपल्या खेळाडूंना घरातल्या वातावरणाची आठवण येऊ नये म्हणून खास सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
-
सणासुदीला प्रत्येकाच्या घरात गोडाधोडाचं जेवण आणि खाण्या-पिण्याची चंगळ असते. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंसाठीही रविवारी खास मिठाई आणि खाण्या-पिण्याची रेलचेल होती. (सर्व छायाचित्र सौजन्य – मुंबई इंडियन्स फेसबूक अकाऊंट)
-
रविवारी मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
-
पराभव पदरात पडला असला तरीही मुंबईच्या खेळाडूंचा खेळ आश्वासक होता. प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुंबईचा संघ आता अवघी काही पावलं दूर आहे. त्यामुळे सर्वांनी सामन्याचा थकवा विसरुन मिठाई आणि खाद्यपदार्थांवर ताव मारला.
-
राजस्थानविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्याने आक्रमक फटकेबाजी केली. परंतू स्टोक्स आणि सॅमसनच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थानने ८ गडी राखून सामना जिंकला.
मिठाई आणि खाण्या-पिण्याची रेलचेल; अबु धाबीत पार पडला मुंबई इंडियन्सचा शाही दसरा
Web Title: Ipl 2020 mumbai indians organize dussera celebration for its players in abu dhabi psd