-
-
भारतीय संघाच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. पहिल्या डावात बुमराहनं ४ बळी घेतले होते. तर अश्विनने तीन बळी घेतले होते. सिराजने दोन तर जाडेजानं एक बळी घेतला होता. दुसऱ्या डावात सिराजनं तीन बळी घेतले होते. तर बुमराह, जाडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले आहेत. तर उमेश यादवला एक विकेट मिळाली आहे. अजिंक्य रहाणेचं शतक बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं आहे. रहाणेनं महत्वाच्या क्षणी शतकी खेली करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका पार पाडली. रहाणेनं कर्णधाराला साजेशी खेळी केली. रविंद्र जाडेजाची अष्टपैलू खेळी भारतीय संघासाठी निर्णायक ठरली आहे. जाडेजानं पहिल्या डावात फलंदाजी करताना अजिंक्य राहणेला चांगली साथ दिली. रहाणेसोबत अश्वासक आणि महत्वाची भागिदारी रचली. जाडेजानं अर्धशतकी खेळी तर केलीच शिवाय दोन्ही डावात तीन फलंदाजांना बादही केलं. सतत अपयशी ठरणार्या पृथ्वी शॉच्या जागी संधी मिळालेल्या शुबमन गिलनं पदार्पणाच्या सामन्यात आपल्या खेळीनं सर्वांची मनं जिंकली. गिल पहिल्या डावात ४५ आणि दुसऱ्या डावात नाबाद ३५ धावांची महत्वाची खेळी केली. दुखापतग्रस्त शमीच्या जागी संधी मिळालेल्या युवा मोहम्मद सिराजनेही आपली छाप पाडली. दुसऱ्या डावात उमेश यादवच्या दुखापतीनंतर सिराजनं अनुभवी गोलंदाजाप्रमाणे मारा केला. सिराजनं पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात महत्वाचे तीन बळी घेतले. अनुभवी बुमराह आणि शमी यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी कोलमडली. स्मिथसारखा तगडा फलंदाजही स्वस्तात माघारी परतला. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात खराब क्षेत्ररक्षण केलं. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं तब्बल ९ झेल सोडले. याचा फटका त्यांना चांगलाच बसला. -
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेनं आपल्या नेतृत्वानं सर्वांची मनं जिंकली. रहाणेनं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात महत्वाचे बदल केले. रहाणेच्या नेतृत्वानं दिग्गजांनाही प्रभावित केलं आहे.
वर्षाचा शेवट गोड, ‘त्या’ पराभवाचा घेतला बदला
Web Title: India win by 8 wickets in melbourne nck