Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sara tendulkar shubman gill dating love affair gossips sachin tendulkar mumbai prithvi shaw ishan kishan aditi hundia athiya shetty kl rahul rumoured girlfriends of team india cricketers vjb

सारा तेंडुलकरशी भारतीय क्रिकेटपटूच्या अफेयरची चर्चा; पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंबद्दल रंगलं ‘गॉसिप’

Updated: September 9, 2021 00:39 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेटपटूंची लाइफस्टाईल आणि अफेअर्स हा कायमच चर्चेचा विषय असतो. क्रिकेटर्सच्या आयुष्यात काय सुरू आहे? याची उत्सुकता प्रत्येक क्रिकेट चाहत्याला असते. गेल्या वर्षभरात करोनामुळे मैदानावर क्रिकेटचा थरार फारसा पाहायला मिळाला नाही, पण क्रिकेटपटूंच्या अफेअर्सच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या. अगदी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्याशीही एका क्रिकेटपटूचं नाव जोडल्याची चर्चा रंगली. पाहूया यंदाच्या वर्षात रंगलेल्या अशाच काही अफेअर्सच्या चर्चांबद्दल... (सर्व फोटो- इन्स्टाग्राम)
    1/11

    भारतीय क्रिकेटपटूंची लाइफस्टाईल आणि अफेअर्स हा कायमच चर्चेचा विषय असतो. क्रिकेटर्सच्या आयुष्यात काय सुरू आहे? याची उत्सुकता प्रत्येक क्रिकेट चाहत्याला असते. गेल्या वर्षभरात करोनामुळे मैदानावर क्रिकेटचा थरार फारसा पाहायला मिळाला नाही, पण क्रिकेटपटूंच्या अफेअर्सच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या. अगदी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्याशीही एका क्रिकेटपटूचं नाव जोडल्याची चर्चा रंगली. पाहूया यंदाच्या वर्षात रंगलेल्या अशाच काही अफेअर्सच्या चर्चांबद्दल… (सर्व फोटो- इन्स्टाग्राम)

  • 2/11

    पृथ्वी शॉ – गेले अनेक महिने पृथ्वी शॉ आणि प्राची सिंग यांच्या अफेअरच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. पृथ्वी शॉच्या फोटोंवर प्राची सिंग सातत्याने कमेंट करताना दिसते.

  • 3/11

    IPLमधील त्याच्या चांगल्या खेळीचा स्क्रीनशॉट तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केला होता. याशिवाय, पृथ्वीदेखील न चुकता प्राचीने केलेल्या कमेंटवर लाइक किंवा रिप्लाय देताना दिसतो. त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी शिजतंय अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

  • 4/11

    ऋषभ पंत- भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत याचं नाव अनेकदा त्याची मैत्रीण इशा नेगी हिच्याशी जोडण्यात आलं आहे. इशा ही इंटेरियर डेकोरेटर आहे. ऋषभने स्वत:च तिच्यासोबतचा एक फोटो जानेवारी २०१९ला पोस्ट केला होता आणि तुझ्यामुळे मी आनंदी राहतो, असं कॅप्शनही दिलं होतं.

  • 5/11

    त्यानंतर जानेवारी २०२०मध्येही त्याने दोघांचा बर्फाळ प्रदेशातील सुट्टी एन्जॉय करतानाचा फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे चाहत्यांना तो नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात तिच्यासोबत कोणता फोटो पोस्ट करतो याची उत्सुकता आहे.

  • 6/11

    लोकेश राहुल- टीम इंडियाचा दमदार खेळाडू केएल राहुल याचं नाव अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्यासोबत दीर्घकाळापासून जोडलं जातंय. हे दोघे एकमेकांच्या फोटोंवर अनेकदा काही ना काही कमेंट्स करताना दिसतात.

  • 7/11

    राहुल आणि अथिया दोघे एकत्र वेळ घातवतानाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसेच, अनेकदा हार्दिक पांड्या किंवा राहुलच्या जवळच्या व्यक्तिंकडून या दोघांच्या फोटोंवर असणाऱ्या सूचक कमेंट्स अफेअर्सच्या चर्चांना अधिकच जोर मिळवून देतात.

  • 8/11

    इशान किशन- मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज इशान किशन याचं नाव आदिती हुंडिया या अभिनेत्रीशी जोडण्या आलं आहे. आदिती एक मॉडेल असून तिने २०१८च्या मिस दिवा सुपरनॅशनल स्पर्धेची ती विजेती आहे.

  • 9/11

    २०१९च्या IPL FINALला आदिती हजर होती, तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. त्यानंतर आदितीने इशानच्या दमदार खेळीचा फोटो स्टोरीवर पोस्ट करत त्याला बेबी असं संबोधलं होतं. तेव्हापासून चाहत्यांमध्ये या चर्चांना अधिकच उधाण आलं.

  • 10/11

    शुबमन गिल- कोलकाताचा दमदार फलंदाज आणि टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल याच्याशी सारा तेंडुलकरचं अफेअर असल्याची चर्चा गेल्या चार-सहा महिन्यापासून रंगली आहे.

  • 11/11

    यंदाच्या IPLमध्ये शुबमनने एका सामन्यात सुंदर असा झेल टिपला. त्यानंतर साराने त्याच्या झेलाचा फोटो पोस्ट करत तो आपल्या स्टोरीवर पोस्ट केला आणि तीन हर्ट्सदेखील (प्रेम व्यक्त करण्याचे इमोजी) पोस्ट केले. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे.

Web Title: Sara tendulkar shubman gill dating love affair gossips sachin tendulkar mumbai prithvi shaw ishan kishan aditi hundia athiya shetty kl rahul rumoured girlfriends of team india cricketers vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.