-
पुण्यात इंग्लडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात कृणाल पांड्याने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं. कृणालने अखेर काही षटकांमध्ये के.एल. राहुलसोबत झटपट फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. योगायोग म्हणजे आज (२४ मार्च) कृणालचा वाढदिवस असून, हार्दिकने त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. (छायाचित्र/इन्स्टाग्राम)
-
पुण्यात झालेला सामना कृणाल आणि हार्दिक पांड्यासाठी हळवा ठरला. सामन्याच्या सुरूवातीलाच हार्दिक पांड्याने कृणालला भारतीय संघाची कॅप दिली. तेव्हा कृणालच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने आकाशाच्या दिशेन कॅप दाखवली. त्यानंतर त्याला अश्रू अनावर झाले.
-
हार्दिकने अलिगन देत त्यांला धीर दिला. दोन्ही भावांच्या या गळाभेटीचा फोटोने सगळ्यांच्याच ह्रदयाचा ठाव घेतला.
-
कृणाल फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा भारताचा डाव संकटात सापडलेला होता. ४१व्या षटकात ५ बाद २०५ अशी भारताची अवस्था होती. कृणालने दडपण न घेता फलंदाजी केली आणि अर्धशतक झळकावलं. त्यानंतर कृणालबरोबर हार्दिकच्या डोळ्यात पाणी तरळले.
-
कृणालच्या खेळीचं कौतूक करत हार्दिक पांड्याने त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
-
"पप्पांना तुझा अभिमान वाटला असेल. ते तुझ्याकडे बघून हसत असतील आणि त्यांनी तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट आधीच पाठवलं. तुला खूप काही मिळावं, त्यासाठी तू पात्र आहेस. तुझ्यावर यापेक्षा जास्त आनंदी होऊ शकत नाही. पप्पा, हे तुमच्यासाठी होतं," अशी भावनिक पोस्ट हार्दिकने लिहिली आहे.
-
हार्दिक आणि कृणाल पांड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघाकडून खेळतात. हार्दिक आणि कृणाल यांचे हिमांशु पांड्या यांचं अलिकडे निधन झालं.
-
ह्रदयविकाराच्या झटक्यानं हिमांशु पांड्या यांचं १६ जानेवारी रोजी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कृणाल आणि हार्दिकवर दुःखाचा डोंगरच कोसळला होता.
-
दोन्ही भावांनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची त्यांची इच्छा होती. पुण्यात झालेल्या सामन्यात हिमांशु पांड्या यांची इच्छा पूर्ण झाली. मात्र, हा क्षण त्यांना बघता आला नाही.
-
वडिलांच्या निधनानंतर भारतीय संघात संधी मिळाल्यानं कृणाल कमालीचा भावनिक झालेला होता. त्यांच्या अर्धशतकानंतर हार्दिकच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याचवेळी त्याच्या डोळ्यातून अश्रुही वाहत होते.
पप्पाने तुला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं; हार्दिकची कृणाल पांड्यासाठी खास पोस्ट
कृणाल पांड्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
Web Title: Hardik pens emotional note to krunal pandya after dream odi debut bmh