• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketers who injured before ipl 2021 asy

‘हे’ क्रिकेटपटू झाले IPL2021 पूर्वी जायबंदी

आयपीएलच्या स्पर्धेपूर्वी काही स्टार खेळाडू जायबंदी झाले आहेत. वाचा कोण आहेत ते खेळाडू…

Updated: September 9, 2021 00:30 IST
Follow Us
  • आयपीएलच्या चौदाव्या पर्वाला काही दिवसांचा अवधी उरला आहे. ९ एप्रिल ते ३० मे अशा कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. मात्र, स्पर्धेपूर्वी काही स्टार खेळाडू जायबंदी झाले आहेत. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
    1/6

    आयपीएलच्या चौदाव्या पर्वाला काही दिवसांचा अवधी उरला आहे. ९ एप्रिल ते ३० मे अशा कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. मात्र, स्पर्धेपूर्वी काही स्टार खेळाडू जायबंदी झाले आहेत. वाचा कोण आहेत ते खेळाडू…

  • 2/6

    जोफ्रा आर्चर – आर्चरच्या हातातून काचेचा एक तुकडा बाहेर काढण्यात आला आहे. घरी साफसफाईदरम्यान फिश टँकच्या काचेमुळे आर्चरच्या हाताला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतरही आर्चर भारत दौऱ्यावर गेला होता. आता त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जोफ्रा आर्चर शस्त्रक्रियेमुळे काही काळ मैदानापासून दूर असणार आहे. त्यामुळे या हंगामात त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. राजस्थान रॉयल्स संघात महत्त्वाचा सदस्य असल्याने आर्चरची गैरहजेरी संघासाठी मोठा धक्का आहे.

  • 3/6

    रविंद्र जाडेजा – क्षेत्ररक्षण करताना जाडेजाच्या बोटांना दुखापत झाली होती.

  • 4/6

    श्रेयस अय्यर – आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झाला. इंग्लंडच्या संघाची फलंदाजी सुरू असताना आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने मारलेला शॉट अडवताना श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.

  • 5/6

    सॅम बिलिंग्स – क्षेत्ररक्षणादरम्यान सीमारेषेवर एक चौकार अडवताना बिलिंग्स जायबंदी झाला होता. त्याच्या गळ्याच्या हाडाला दुखापत झाली.

  • 6/6

    ईऑन मॉर्गन – क्षेत्ररक्षण करताना मॉर्गनच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली होती. त्यावर चार टाके मारण्यात आले आहेत.

TOPICS
आयपीएल २०२१ (IPL 2021)IPL 2021

Web Title: Cricketers who injured before ipl 2021 asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.