-
महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आणि देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपले वचन पूर्ण केले आहे.
-
अलिकडेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू जायबंदी असताना ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित पराभवाचं पाणी पाजणाऱ्या टीम इंडियातील सहा तरुण खेळाडूंच्या कामगिरीवर उद्योगपती आनंद महिंद्रा भलतेच खूश झाले होते आणि त्यांनी या तरुण खेळाडूंना एक शानदार गिफ्ट देण्याची घोषणा केली होती.
-
ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतात येताच आनंद महिंद्रा यांनी आपल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची ढासू ऑफ रोडर एसयूव्ही THAR टीम इंडियाच्या सहा तरुण खेळाडूंना गिफ्ट म्हणून देणार असल्याचं जाहीर केलं होतं.
-
त्यानुसार आता त्यांनी टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज टी.नटराजन याला THAR SUV गिफ्ट केली आहे. काल (दि.१) ही दमदार एसयूव्ही नटराजनला मिळाली.
-
आनंद महिंद्रा यांनी गाबा कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराज, टी. नटराजन, शुबमन गिल, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना महिंद्रा थार गिफ्ट करण्याची घोषणा केली होती, काल ही थार एसयूव्ही नटराजनला मिळाली. नटराजनने ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
-
नटराजनच्या आधी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यानेही महिंद्रांनी थार गिफ्ट करण्याची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी महिंद्रांनी इतकं ढासू गिफ्ट जाहीर केल्याने मराठमोळा शार्दुल ठाकूरही भलताच खूश झाला होता.
-
"थँक्यू सर… तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणं हिच माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे….तुमच्याकडून आलेलं गिफ्ट सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे….तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे अशक्य गोष्टी धुंडाळल्या पाहिजेत. तुम्ही दिलेल्या या गिफ्टसाठी मी आभारी आहे.", असं म्हणत शार्दुलने महिंद्रांचे आभार मानले होते.
-
तरुण खेळाडूंनी भारतातील भविष्यातील तरुण पिढ्यांसाठी स्वप्न पाहण्याची आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांचं मनोबल वाढावं म्हणून थार एसयूव्ही गिफ्ट केल्याचं महिंद्रांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.
-
त्यावर महिंद्रांकडून थार भेटल्यानंतर नटराजनने ट्विटरद्वारे चांगल्या लोकांचा पाठिंबा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे अशक्यप्राय गोष्टी करणं शक्य झालं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
-
"भारतासाठी क्रिकेट खेळणं माझ्यासाठी जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. माझा हा प्रवास खूप वेगळा होता. या प्रवासात मला जे प्रेम आणि आपलेपण मिळालंय ते पाहून मी भारावून गेलो आहे. चांगल्या लोकांचा पाठिंबा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे अशक्यप्राय गोष्टी करणं शक्य झालं", असं नटराजनने ट्विटरद्वारे सांगितलं.
-
दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने, "मी आज महिंद्रा थार चालवत घरी पोहोचलो आहे. आनंद महिंद्रांचे आभार मानतो, ज्यांनी माझा प्रवास ओळखला आणि प्रोत्साहन दिलं. तुमचं क्रिकेटवरील प्रेम बघून मला विश्वास आहे की माझी गाबा कसोटीतील ही स्वाक्षरीकृत जर्सी तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटेल", असं म्हणत नटराजनने गाबा कसोटीत त्याने घातलेली जर्सी स्वतःची स्वाक्षरी करत महिंद्रांना भेट म्हणून पाठवली.
-
थार गिफ्ट मिळाल्यानंतर नटराजनने गाबा कसोटीत त्याने घातलेली टीम इंडियाची जर्सी स्वतःची स्वाक्षरी करत महिंद्रांना भेट म्हणून पाठवली, सोबत ही जर्सी तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटेल असा खास संदेशही दिला.
-
नटराजनने ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यातूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या दौऱ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये त्याने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं होतं.
-
THAR ही महिंद्रा कंपनीची ऑफ रोडर एसयूव्ही असून भारतात लाँच झाल्यापासून ग्राहकांमध्ये या गाडीची चांगलीच डिमांड आहे.
-
या गाडीची भारतात किती मागणी आहे हे यावरुनच लक्षात येतं की, बूक केलेल्यांनाही गाडी घरी नेण्यासाठी अनेक महिने वाट बघावी लागतेय. 10 ते 15 लाख रुपयांदरम्यान या दमदार एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत आहे.
आनंद महिंद्रांनी शब्द पाळला! नटराजनला गिफ्ट केली Thar SUV, रिटर्नमध्ये त्यानेही पाठवलं खास ‘गिफ्ट’
महिंद्रांकडून THAR SUV मिळाल्यानंतर नटराजननेही पाठवलं ‘खास’ गिफ्ट
Web Title: Team india t natarajan receives thar suv thanks anand mahindra with signed gabba shirt in return sas