-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये फिलिपिन्सच्या हिडिलीन डिआझनं ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या देशवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे.
-
वेटलिफ्टिंगपटू असणाऱ्या हिडिलीन डिआझ ५५ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.
-
फिलिपिन्सच्या कोणत्याही खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
-
हिडिलीन डिआझ ही ३० वर्षींची आहे. तिची ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा आहे.
-
मागील तीन स्पर्धांमध्ये तिला सुवर्णपदकाने सतत हुलकावणी दिल्यानंतर अखेर चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला सुवर्ण कामगिरी करता आली.
-
विशेष म्हणजे सुवर्णपदक जिंकताना हिडिलीन डिआझने २२४ किलो वजन उचलत ऑलिम्पिकचा नवीन विक्रमही प्रस्थापित केलाय.
-
"मी ३० वर्षांची आहे. त्यामुळेच वय वाढण्याबरोबर कामगिरीचा आलेख उतरता असेल असं मला वाटलं होतं. मात्र पदक जिंकल्याने मलाच स्वत:ला सुखद धक्का बसलाय," असं मत हिडिलीन डिआझने व्यक्त केलं.
-
हिडिलीन डिआझने सुवर्णपदक जिंकल्यानंतर फिलिपिन्सच्या अध्यक्षांचे प्रवक्ते हॅरी रोक्यू यांनी तिचं कौतुक केलं आहे.
-
डिआझने सर्व देशवासियांना गौरव वाटावा अशी कामगिरी केल्याचं रोक्यू म्हणालेत.
-
चीनच्या लिओ क्वियून (२२३ किलो) आणि कझाकस्तानच्या झुल्फिया चिनशानलो (२१३ किलो) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं.
-
हिडिलीन डिआझने आता पॅरिसमध्ये होणाऱ्या पुढील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. या पदकामुळे डिआझला आत्मविश्वास वाढलाय.
-
सुवर्णपदक मिळाल्यानंतर डिआझला आश्रू अनावर झाले.
-
मागील वर्षी पेरुमधील ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी जाण्यासाठी निघालेली डिआझ मलेशियात अडकल्यानंतर तिच्यावर करोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांची प्रवास बंदी घालण्यात आलेली.
-
या बंदीमध्येही डिआझने आपला सराव थांबू न देता घरातच जीम निर्माण करुन सराव सुरु ठेवला.
-
फिलिपिन्स हा देश १९२४ पासून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. मात्र आतापर्यंत या देशाला केवळ तीन रौप्य आणि सात कांस्य पदकांवर नाव कोरता आलं आहे. मात्र डिआझने पहिल्यांदाच फिलिपिन्सला सुवर्ण पदक मिळवून दिलंय.
-
डिआझने सुवर्णपदक जिंकल्याने ९७ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑलम्पिकमध्ये फिलिपिन्सचं राष्ट्रगीत वाजलं.
-
डिआझनेही आपल्या राष्ट्रध्वजाला अशापद्धतीने सॅल्यूट ठोकला. डिआझला पाच कोटी रुपये म्हणजेच ३३ मिलियन पीसॉस बक्षिस म्हणून मिळणार आहेत.
-
फिलिपिन्स सरकारने प्रत्येक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १० मिलियन पीसॉस देणार असल्याचं आधीच जाहीर केलेलं.
-
डिआझला काही उद्योजकांकडूनही बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळणार असल्याने एकूण बक्षिसाची रक्कम ३३ मिलियन पीसॉसपर्यंत जाईल असं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. तसेच डिआझला एक आलिशान घरही या कामगिरीसाठी भेट म्हणून देण्यात येणार आहे.
-
डिआझचा ऑलम्पिकमधील प्रवास सांगणारा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळतं हे डिआझने दाखवून दिल्याचं सांगत प्रयत्न सोडू नका असा संदेश दिला जातोय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
Olympics 2020: ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं; ५ कोटी रुपये, घर भेट म्हणून मिळालं
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिनं ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या देशवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे.
Web Title: Olympics 2020 hidilyn diaz philippine first ever gold medalist wins 5 crore and a house scsg