• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. olympics 2020 tokyo olympics boxer lovelina borgohain journey scsg

वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; भारतासाठी मेडल निश्चित करणाऱ्या लव्हलिनाचा प्रेरणादायी प्रवास

लव्हलिनाला प्रशिक्षण देणाऱ्यांपैकी काहींना करोनाची लागण झाल्याने तिने एकटीनेच सराव केला.

July 30, 2021 16:15 IST
Follow Us
  • Olympics 2020 Tokyo Olympics Boxer Lovelina Borgohain Journey
    1/40

    भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने शुक्रवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील रोमहर्षक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनला पराभूत केलं.

  • 2/40

    लव्हलिनाने निन-चीनवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचं टोक्यो ऑलिम्पिकमधील आणखीन एक पदक निश्चित केलंय.

  • 3/40

    विजयी घोषित केल्यानंतर लव्हलिनाने आपल्या प्रशिक्षकांना अशापद्धतीने मिठी मारली.

  • 4/40

    लव्हलिना ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची दुसरी महिला बॉक्सिंगपटू ठरणार आहे. यापूर्वी हा पराक्रम मेरी कोम हिने करुन दाखवलाय.

  • 5/40

    मेरीने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं होतं.

  • 6/40

    तर २००८ मध्ये विजेंदर सिंहने देशाला बॉक्सिंगमध्ये रौप्य पदक मिळवून दिलं होतं.

  • 7/40

    लव्हलिना ही ऑलिम्पिकमध्ये एवढ्या पुढील लेव्हलपर्यंत गेलेली पहिली महिला बॉक्सिंगपटू आहे. यापूर्वी आसाममधील शिवा थापा हे ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळले होते.

  • 8/40

    मागील वर्षी लव्हलिनाला करोनाची लागण झाल्यानंतर तिला सरावासाठी यूरोप दौऱ्यावर जाता आलं नाही.

  • 9/40

    त्यामुळेच लव्हलिनाने भारतामध्ये राहूनच सराव केला. म्हणूनच तिचा हा विजय अधिक महत्वाचा आहे.

  • 10/40

    लव्हलिनाचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास फार खडतर होता. कोणत्याही लहान शहरामधून किंवा गावातून आलेल्या खेळाडूंप्रमाणे तिलाही आर्थिक संकटांचा आणि समाजातून होणाऱ्या विरोधाचा सामना करावा लागला.

  • 11/40

    लव्हलिनाचा जन्म आसाममधील गोलाघाट जिल्ह्यामध्ये २ ऑक्टोबर १९९७ साली झाला.

  • 12/40

    लव्हलिनाचे वडील टिकेन हे एक छोटे व्यापारी होते. त्यांनी आपल्या मुलीची बॉक्सिंग सारख्या क्षेत्रात करियर करण्याची हौस पूर्ण करण्यासाठी बराच संघर्ष केला.

  • 13/40

    लव्हलिनाला दोन मोठ्या जुळ्या बहिणी असून त्यांची नाव लिचा आणि लीमा अशी आहेत.

  • 14/40

    लव्हलिनाच्या दोन्ही बहिणी किक बॉक्सिंगपटू आहेत. त्यांना पाहून लव्हलिनानेही या खेळांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली.

  • 15/40

    लव्हलिनाच्या दोन्ही बहिणी किक बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय विजेत्या ठरल्या. मात्र लव्हलिनाने किक बॉक्सिंगऐवजी बॉक्सिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला.

  • 16/40

    लव्हलिनाला किक बॉक्सिंगऐवजी बॉक्सिंगची आवड कशी निर्माण झाली याची कथा मोठी रंजक आहे.

  • 17/40

    एकदा लव्हलिनाचे वडील एका वृत्तपत्रामध्ये गुंडाळून मिठाई घरी घेऊन आले.

  • 18/40

    ही मिठाई ज्या वृत्तपत्रामध्ये गुंडाळली होती त्यावर बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांचा एक फोटो होता. हा फोटो पाहून लव्हलिनाने तिच्या वडीलांकडे या खेळाबद्दल चौकशी केली.

  • 19/40

    लव्हलिनाच्या वडीलांनी तिला मोहम्मद अली यांच्या संघर्षमय प्रवसाची कथा सांगितली. त्यानंतर लव्हलिनाचं संपूर्ण आयुष्यच बदललं.

  • 20/40

    लव्हलिनाने मोहम्मद अली यांच्याकडून प्रेरणा घेऊन किक बॉक्सिंगऐवजी बॉक्सिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला.

  • 21/40

    लव्हलिनाचे बॉक्सिंगमधील कौशल्य सर्वात आधी तिचे राष्ट्रीय प्रशिक्षक पोडम बोरो यांना शालेय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेदरम्यान जाणवलं.

  • 22/40

    २०१२ मध्ये लव्हलिनाने बॉक्सिंग अकदामीमध्ये सहभागी होण्यासाठी गेली आणि तिथे तिने पोडम यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

  • 23/40

    पाच वर्षानंतर म्हणजेच २०१७ मध्ये लव्हलिनाने आशियाई चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक पटावलं. तिथूनच तिच्या बॉक्सिंगमधील करियरची घौडदौड सुरु झाली.

  • 24/40

    २०१८ मध्ये लव्हलिनाने दिल्लीमधील इंडियन ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर तिला २०१८ च्या राष्ट्रकूल खेळांसाठी भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली.

  • 25/40

    २०१८ मध्येच लव्हलिनाने मंगोलियातील उलानबटार कपमध्ये रौप्य पदक जिंकलं आणि नंतर सिलेसियन चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदकावर नाव कोरलं. तिने ही दोन्ही पदक ६९ किलो वजनी गटात जिंकली.

  • 26/40

    लव्हलिना सोशल नेटवर्किंगवरही बरीच सक्रीय असते. अनेकदा ती वृश्रारोपणाचे फोटो शेअर करताना दिसते.

  • 27/40

    आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगपटू झाल्यानंतरही लव्हलिनाने आपला साधेपणा कायम ठेवलाय. ती अनेकदा भातशेतीची कामं करताना दिसते.

  • 28/40

    टोक्योमधून लव्हलिनाने शेअर केलेला हा फोटो.

  • 29/40

    २०२० साली लव्हलिनाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

  • 30/40

    मिळालेल्या संधीचं सोनं करत आत लव्हलिना ऑलिम्पिकपर्यंत पोहचलीय.

  • 31/40

    टोक्यो ऑलिम्पिकच्या आधीचे काही महिने लव्हलिनासाठी फारच कठीण गेले.

  • 32/40

    प्रत्येक खेळाडू ऑलिम्पिकसाठी तयारी करत होता. मात्र दुसरीकडे लव्हलिनाच्या आईवर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रीय होणार असल्याने ती आईसोबत होती.

  • 33/40

    आईची शस्त्रक्रीया झाल्यानंतर लव्हलिना बॉक्सिंगच्या रिंगमध्ये सरावासाठी उतरली.

  • 34/40

    मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या प्रशिक्षणामध्येही बरेच अडथळे आले.

  • 35/40

    लव्हलिनाला प्रशिक्षण देणाऱ्यांपैकी काहींना करोनाची लागण झाल्याने तिने एकटीनेच सराव केला.

  • 36/40

    लव्हलिनाने व्हिडीओ कॉलवरुन प्रशिक्षणाचे धडे घेतले.

  • 37/40

    लव्हलिनाने हिंमत सोडली नाही आणि आज ती थेट ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदाकापासून दोन विजय दूर आहे.

  • 38/40

    प्री क्वार्टर फायनल्समध्ये लव्हलिनाविरुद्ध खेळाडू नसल्याने लव्हलिनाला पुढील फेरीत प्रवेश देण्यात आला.

  • 39/40

    जर्मनीच्या खेळाडूला हरवून ती क्वार्टर फायनल्समध्ये पोहचली.

  • 40/40

    आता मिराबाई चानूनंतर भारतासाठी लव्हलिना पदक आणणार असल्याने अंतिम सामन्यांसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. (सर्व फोटो : ट्विटर, पीटीआय आणि रॉयटर्सवरुन साभार)

TOPICS
ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024)Olympic 2024

Web Title: Olympics 2020 tokyo olympics boxer lovelina borgohain journey scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.