• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. israels olympic gold medalist artem dolgopyat cant marry in the country his mother laments scsg

“सरकार त्याचं लग्न होऊ देणार नाही”; ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूच्या आईला मुलाच्या संसाराची चिंता

मुलाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीसंदर्भात त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं असता त्यांनी मुलाच्या लग्नाबद्दलचीच चिंता व्यक्त केली

August 3, 2021 16:14 IST
Follow Us
  • Israels Olympic gold medalist Artem Dolgopyat cant marry in the country his mother laments
    1/15

    आर्टम दोलगोपायट याने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदावर नाव कोरण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. मात्र या विजयानंतरही त्याचं मैत्रिणीसोबत विवाहबंधनात अडकण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाहीय.

  • 2/15

    युक्रेनमध्ये जन्म झालेल्या इस्रायली वंशाचा जिमनॅस्ट असणाऱ्या आर्टमने इस्रायलसाठी हे पदक जिंकलं.

  • 3/15

    इस्रायलचं हे ऑलिम्पिकमधील दुसरं सुवर्णपदक असून या विजयानंतर आर्टमचं सर्वच स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे. त्याच्या विजयानंतर इस्रायली नागरिकांनी मैदानामध्येही मोठा जल्लोष केल्याचं पहायला मिळालं.

  • 4/15

    मात्र आता आर्टम दोलगोपायटच्या या विजयानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आर्टमच्या आईने या विजयासंदर्भात आनंद व्यक्त करतानाच लाडक्या मुलाच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केलीय.

  • 5/15

    इस्रायलमधील रुढीवादी कायद्यांमुळे माझ्या मुलाला यहूदी म्हणून मान्यता दिली जात नसल्याने त्याच्या लग्नात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असं आर्टमची आई सांगते.

  • 6/15

    एफएप १०३ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आर्टमची आई अ‍ँजेला बिलान दिलेल्या माहितीनुसार सरकार त्यांच्या मुलाला लग्न करण्याची परवानगी देणार नाही. त्यानंतर नवीन वाद सुरु झाला आहे.

  • 7/15

    आर्टमला यहूदी म्हणून मान्यता मिळत नसल्याने त्याला त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न करता येणार नसल्याचं त्याच्या आईने म्हटलं आहे.

  • 8/15

    इस्रायलमधील नियमांनुसार दुसऱ्या देशांमधून परत आपल्या देशात येताना त्या व्यक्तीच्या वडीलांचे पालक अथवा आईचे पालक यहूदी असतील तरच त्यांना इस्रायलचं नागरिकत्व देण्यात येतं.

  • 9/15

    तसेच ज्या व्यक्तीला यहूदी म्हणून मान्यता दिली जाते त्याला जन्म देणारी महिला यहूदी असणं तेथील धार्मिक कायद्यानुसार बंधनकारक आहे. या नियमांमध्ये आर्टम बसत नाही.

  • 10/15

    आर्टमलाही लग्न करायचं असेल तर ते दुसऱ्या देशात जाऊन करावं लागणार आहे असं त्याची आई अँजेला सांगते. मात्र आर्टमचा सराव आणि व्यवस्थ वेळापत्रक कायदेशीर बाबी पाहता हे शक्य होणार नसल्याचंही त्या सांगतात.

  • 11/15

    यहूदी धर्माच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला यहूदी तेव्हाच म्हणता येतं जेव्हा त्याची आई यहूदी असते. या धर्माच्या कायद्यानुसार पूर्व सोव्हिएत संघामधून मायदेशी परतलेल्या अनेकांना भेदभावाचा समाना करावा लागत असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. आर्टमच्या निमित्ताने हा वाद पुन्हा समोर आलाय.

  • 12/15

    आर्टमचे वडील यहूदी आहेत मात्र आई यहूदी नाहीय. युक्रेनमधून परतल्यानंतर आर्टम इस्रायलमध्ये स्थायिक झाला आहे. तो येथील लष्करामध्ये कार्यरत आहे.

  • 13/15

    मात्र येथील धार्मिक नियांनुसार आर्टम लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारांना जाऊ शकत नाही.

  • 14/15

    आर्टमच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आर्टम आणि त्याची मैत्रीण मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. मात्र धार्मिक अडचणींमुळे ते लग्न करु शकत नाहीत.

  • 15/15

    याचसंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये आर्टमला पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता त्याने या गोष्टी माझ्या मनात असून सध्या मी यावर बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. (सर्व फोटो : रॉयटर्स, ट्विटर आणि व्हिडीओवरुन स्क्रीनशॉर्ट)

Web Title: Israels olympic gold medalist artem dolgopyat cant marry in the country his mother laments scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.