• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. tokyo olympics wrestlers ravi dahiya villagers have hope on him scsg

दोन तास वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्यासाठी धडपड अन्… ऑलिम्पिकमधील एक मेडल ‘या’ गावाचा चेहरामोहरा बदलू शकतं

मुलाला योग्य आहार मिळावा, म्हणून दूध आणि लोणी घेऊन राकेश दहिया दररोज छत्रसाल स्टेडियमपर्यंतचे ६० किमी अंतर कापतात

August 4, 2021 12:33 IST
Follow Us
  • Tokyo Olympics Wrestlers Ravi Dahiya Villagers have hope on him
    1/11

    भारतीय कुस्तीपटू रवी दहिया आणि दीपक पूनिया यांनी उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे.

  • 2/11

    ५७ किलो वजनी गटामध्ये रवी दहियाने बल्गेरियाच्या वॅलिंटिनोवचा १४-४ असा पराभव केला.

  • 3/11

    सामन्याच्या सुरुवातीलाच रवीने वॉलिंटिनोववर ६-० ची आघाडी मिळवली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. रवीने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. रवीच्या डावपेचांसमोर बुल्गेरियन कुस्तीपटू फारच फिका पडल्याचं चित्र सामन्यामध्ये दिसलं. रवीने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं तर संपूर्ण गावाचं भलं होणार आहे.

  • 4/11

    सोनीपत जिल्ह्यातील जवळपास १५ हजार लोकसंख्येचे नाहरी गाव कुस्तीपटू रवी दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा करीत आहे, कारण रवीच्या पदकामुळे गावाचा विकास होईल अशी त्यांना आशा आहे.

  • 5/11

    रवीच्या नाहरी गावातील नागरिकांना नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी धडपडायला लागते. दिवसभरात दोन तास वीजपुरवठा होतो, त्यात सर्व कामे उरकावी लागतात.

  • 6/11

    सांडपाण्याचा निचरा होण्यासाठीही योग्य व्यवस्था येथे नाही. गावात फक्त महत्त्वाचे असे एक पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. त्यामुळे रवीने पदक जिंकल्यास गावचे चित्र पालटू शकेल.

  • 7/11

    शांत स्वभावाच्या रवीचे वडील राकेश कुमार दहिया हे शेतकरी आहेत. महावीर सिंग (१९८०-मॉस्को, १९८४-लॉस एंजेलिस) आणि अमित दहिया (लंडन-२०१२) यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा रवी हा तिसरा क्रीडापटू आहे.

  • 8/11

    दोनदा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महावीरला तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांनी ‘तुझी काय इच्छा आहे?’ असे विचारले होते. त्याने मागितल्याप्रमाणे पशुवैद्यकीय रुग्णालय नंतर गावात निर्माण झाले. अशीच आशा आता गावातील लोकांना रवीकडून आहे.

  • 9/11

    त्यामुळे रवीने पदक जिंकल्यास चार हजार कुटुंबीयाच्या या गावासाठी काही विकास प्रकल्प मागता येतील, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.

  • 10/11

    रवीच्या वडिलांनी एक वर्षांसाठी शेत भाडय़ाने घेतले असून, तिथेच ते कसून मेहनत करतात, परंतु रवीच्या सरावात कधीच खंड पडला नाही.

  • 11/11

    रवी दहिया

Web Title: Tokyo olympics wrestlers ravi dahiya villagers have hope on him scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.